मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनयापासून दूर असली तरी तिच्याबद्दल सतत चर्चा रंगलेल्या असतात.  मग त्या रंगणाऱ्या चर्चांमागे  कारण काहीही असो.. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत आली आहे ती म्हणजे 2006 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम 2' चित्रपटामुळे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशनने स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील दोघांचा लुक्स, डान्स, रोमान्स इत्यादी गोष्टींमुळे चित्रपट तुफान चर्चेत होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) च्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा चर्चेत आहे. ही किस्सा 17 वर्ष जुना आहे आणि बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) शी संबंधित आहे. हा चित्रपट दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi)  यांनी दिग्दर्शित केला होता.


या चित्रपटात ऐश्वर्या आणि हृतिक रोशनच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. गंमत म्हणजे या चित्रपटात ऐश्वर्याचा पती अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) ही मुख्य भूमिकेत होता. या तिघांशिवाय उदय चोप्रा आणि बिपाशा बसू यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला.
 
जाणून घ्या काय आहे प्रकरण
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनयापासून दूर असली तरी तिच्याबद्दल सतत चर्चा रंगलेल्या असतात.  मग त्या रंगणाऱ्या चर्चांमागे  कारण काहीही असो.. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत आली आहे ती म्हणजे 2006 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम 2' चित्रपटामुळे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशनने स्क्रिन शेअर केली.  


कायदेशीर नोटीसबद्दल, ऐश्वर्याने स्वतः एकदा फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की ती ऑनस्क्रीन किसिंगला सहमत नाही. ती किसिंग सीन करताना अजिबात कम्फर्टेबल नव्हती. किसिंग सीनला मान्यता न दिल्यामुळे तिने अनेक हॉलिवूड चित्रपट सोडले.


पण हिंदी चित्रपटसृष्टीत आधी प्रयत्न करण्याचा विचार तिने केला आणि त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घ्यायचं होतं. तिने आपल्या मुलाखतीत कबूल केलं आहे की, तिने चित्रपटात तो  सीन केला होता ज्यामुळे तिला देशातील अनेकांनी कायदेशीर नोटीस पाठवल्या होत्या. कायदेशीर नोटीसमध्ये तिने असं का केलं, असं लेखी स्वरुपात तिला विचारलंही होतं. ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार, नोटीसमध्ये लिहिलं आहे की, 'तू प्रतिष्ठित आहेस, तू आमच्या मुलींसाठी एक उदाहरण आहेस, तू दिलेला हा सीन आम्हाला पटतच नाही, तु हे का केलंस?


मीडिया रिपोर्टनुसार या दिवसातच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचा साखरपुडा झाला होता. यासाठीच बच्चन परिवार तिच्यावर नाराज होता. चर्चांवर जर विश्वास ठेवायचा झाला तर, ऐश्वर्याचा आणि हृतिकचा किसींग सीन पाहून अभिषेक ईतका नाराज झाला होता की, त्याने हृतिकसोबत बोलणं बंद केलं होतं. एवढंच नव्हे तर, बच्चन फॅमेलीनेदेखील पुर्ण प्रयत्न केला की हा सीन काढून टाकण्याचा मात्र असं होऊ शकलं नाही. हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.