`भाभी जी घर पर हैं` फेम गोरी मॅमला चक्क गोऱ्या रंगामुळे मिळत नव्हतं काम
भाभी जी घर पर हैं फेम अभिनेत्री सौम्या टंडन तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.
मुंबई : भाभी जी घर पर हैं फेम अभिनेत्री सौम्या टंडन तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. शोमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या सौम्याची आज इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे. सौम्या टंडन प्रेक्षकांमध्ये गोरी मॅम म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र तुम्हाला माहित आहे का की सौम्याला तिच्या गोरेपणामुळे एकदा रिजेक्ट करण्यात आलं होतं.
खरंतर, तिने स्वतः एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या आयुष्याशी संबंधित हा किस्सा शेअर करताना सौम्याने सांगितलं की, तिलाही तिच्या गोरेपणामुळे काम मिळत नव्हतं. यानंतर, संपूर्ण किस्सा सांगत असताना तिने सांगितलं की, ती एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये भारतीय नागरिकाची भूमिका करण्यासाठी ऑडिशनला गेली होती.
तिने पुढे सांगितलं की, जेव्हा ऑडिशन घेताना त्यांना दिसले, की मी खूप गोरी आहे आणि मी भारतीय आहे तेव्हा मला नकार देण्यात आला. ती पुढे म्हणाली की, आम्ही भारतीय मुलींना इतकं गोरं दाखवू शकत नाही.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, त्या लोकांना विश्वास बसत नव्हता की, मी भारतीय आहे आणि इथे खूप गोऱ्या मुली आहेत. कारण फक्त अमेरिका, लंडन, पाश्चिमात्य देशातच इतक्या गोऱ्या मुली असतात. असा त्यांचा दृष्टिकोन होता. भारतीय मुली फक्त सावळ्या रंगाच्या असतात असा त्यांचा समज होता. सौम्या म्हणाली की, लोकांचा असा विश्वास आहे की फक्त गोरी स्किन असलेल्या मुलीच सुंदर असतात. पण असं अजिबात नाही, प्रत्येक रंग सुंदर असतो.