Amitabh Bachchan : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन ही सध्या 'केबीसी 16' चं सुत्रसंचालन करत आहेत. आज सगळे त्यांना दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे दिवाळीचे त्यांचे किस्से सगळ्यांच्या लक्षात आहेत. एकदा अमिताभ यांचे दिवाळीच्या फटाक्यांमुळे हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी शूटिंगमध्ये अमिताभ यांनी त्यांना झालेली जखम ही शूटच्यावेळी लपवली आणि त्याचा किस्सा त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता. हा किस्सा त्यांचा 'शराबी' या चित्रपटा दरम्यानचा आहे. त्यावेळी फटाक्यांमुळे झालेली दुखापत पाहता अमिताभ यांनी हाताला रुमाल बांधला आणि नंतर थेट खिश्यात ठेवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेख केला. बिग बींनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी फटाके फोडताना झालेली दुखापत लपवत त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग हे थांबणार नाही याची काळजी घेतली. अमिताभ यांनी याविषयी सांगितलं की 'ते म्हणाले काम थांबलं नाही. स्टाइलसाठी मी माझा हात रुमालात लपवला, पण त्या दरम्यान, देखील माझं काम हे सुरु होतं, जे कुठेही थांबायला नको हवं होतं. सगळ्यात आधी मद्रास प्रोडक्शनचा चित्रपट आणि दुसरा शराबी चित्रपट होता. दोन्ही चित्रपटांच्या पडद्यामागे काय घडलं त्याची एक मजेशीर गोष्ट आहे. पण आता त्या गोष्टींचा उल्लेख करणं योग्य ठरणार नाही.'


या दरम्यान, अमिताभ हे 'शराबी' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यावेळी फटाके फोडताना त्यांचा हात हा फटाके फोडताना जळाला होता. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी त्यांना सांगितलं की तुमचा भाजलेला हात हा पॅन्टेच्या खिशात ठेवून लपवून घ्या. अमिताभ यांना त्यांचा हा सल्ला खूप आवडला आणि त्यांनी लगेच खिशात हात ठेवला आणि संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग केलं. त्यानंतर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ही स्टाईल ट्रेंड करू लागली. 


रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर अमिताभ यांना जवळपास दोन महिने सगळा त्रास सहन करावा लागला. त्यांना त्यांच्या अंगठ्या आणि तर्जनी अर्थात (अंगठ्याच्या शेजारचं बोट) थोडही हलवलं की त्यांना त्रास व्हायचा. त्यानंतर बऱ्याच काळानं त्यांचा हात बरा झाला. 


हेही वाचा : KBC 16 मध्ये पहिल्यांदाट UPSC परिक्षार्थीनं थेट अमिताभ यांनाच दिला सल्ला


बच्चन कुटुंब हे नेहमीच त्यांच्या भव्य अशा दिवाळी पार्टीसाठी ओळखलं जायचं. त्यांनी 2020 मध्ये दिवाळी साजरी केली नाही आणि त्याच्या दोन वर्षानंतर अर्थात 2022 मध्ये पुन्हा एकदा दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळी पार्टी सेलिब्रेट केली होती.