मुंबई : 'एक बार मैने जो कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता', असं रुपेरी पडद्यावर मोठ्या रुबाबात म्हणणारा अभिनेता सलमान खान, हा खऱ्या जीवनातही त्याच्या कमिटमेंटसाठी ओळखला जातो. भाईजानची ही कमिटमेंट तशी चर्चेचा विषय. पण, आता मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सलमानविषयीची ही चर्चा रंगण्यामागचं कारण आहे, त्याने थकवलेले एका मॅकॅनिकचे पैसे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द सलमाननेच त्याच्या बालपणीचा हा किस्सा सर्वांना सांगितला. मुंबई पोलीस वेल्फेअरच्या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या 'उमंग' या कार्यक्रमादरम्यान,  विनोदवीर कपिल शर्मा याच्याशी संवाद साधत असताना त्याने याविषयीचा खुलासा केला. आपण, मॅकॅनिकला सव्वा रुपया द्यायचं विसरुनच गेलो होतो, हे सलमानने सांगितलं. 


सायकलचं चाक व्यवस्थित करुन घेण्यासाठी म्हणून जेव्हा सलमान जेव्हा पुन्हा एकदा त्याच मॅकॅनिककडे गेला तेव्हा त्याला या सव्वा रुपयाच्या थकित रकमेविषयी कळलं. 



आपल्यासोबत घडलेल्या त्याच प्रसंगाविषयी सांगताना सलमान म्हणाला होता, ''मी त्यावेळी शॉर्ट्स घातले होते आणि माझ्याकडे पैसेच नव्हते. तेव्हा मी काकांना तात्पुरतं चाक नीट करा मी तुम्हाला नंतर पैसे देतो असं सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाले, 'तू लहानपणीपण असाच करायचास. खुप आधी, तू माध्याकडून सायकल ठीक करुन घेतली होतीस आणि आजपर्यंत त्याचै पेसे दिले नाहीस. आजपर्यंत तुझं सव्वा रुपयांचं उधार आहे'. काकांचं हे बोलणं ऐकून मलाच खुप लाज वाटली''.


भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क


मुख्य म्हणजे ज्यावेळी सलमानने मॅकॅनिक काकांचे हे पैसे परतवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. पैसे थकवल्याची बाब कितीही खरी असली तरीही सलमानला काका हे थट्टेच्या सुरात बोलले असणार यात शंका नाही.