मुंबई : नात्यांची समीकरणं शब्दांत मांडता येणं अनेकदा कठीण होऊन बसतं. याला कारणंही तशीच असतात. कलाविश्वात याच समीकरणांचं वेगळ रुप पाहायला मिळतं. असंच एक नातं काही वर्षांपूर्वी अनेकांच्याच मनात कुतूहलाची भावना निर्माण करुन गेलं होतं. हे नातं होतं दोन प्रतिष्ठीत सेलिब्रिटी कुटुंबांमधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिष्मा कपूर  Karishma Kapoor यांच्या कुटुंबीयांमध्ये असणारी मैत्री सर्वज्ञात. हीच मैत्री काही वर्षांपूर्वी सोयरीकीमध्ये बदलू शकली असती. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. २००२ मध्ये अभिषेक आणि करिष्माच्या नात्याची माहिती सर्वांनाच झाली. पुढं २००३ च्या सुमारास ही जोडी विवाहबंधनात अडकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच एक असं वळण आलं की ही नात्याची घडीच विस्कटली. 


२००२ मधील असाच एक व्हिडिओ कायमतच अनेकांचं लक्ष वेधत आला आहे. या व्हिड़िओमध्ये जया बच्चन या करिष्माची ओळख आपली होणारी सून, म्हणून करुन देत आहेत. 


'बच्चन आणि नंदा कुटुंबाच्या या नात्यात आता मी आणखी एका कुटुंबाचं स्वागत करते. ते म्हणजे कपूर कुटुंब आणि मी स्वागत करते माझी होणारी सून, करिष्मा कपूर हिचं', असं म्हणत जया बच्चन करिष्माला व्यासपीठावर बोलवत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 



अभिषेकनं त्याच्या वडिलांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त पालकांना ही खास भेट दिली आहे, असं म्हणत जया बच्चन यांनी करिष्माची ओळख करुन दिली. त्यावेळी काहीशी लाजरी करिष्मा सर्वांची मनं जिंकून गेली. पण, त्यांचं हे नातं पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. पुढे जाऊन या दोघांच्यानी जीवनात आलेली वळणं सर्वचजण जाणतात.