मुंबई : चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रीके त्याच्या दमदार विनोदी अंदाजासाठी विशेष ओळखला जातो. अनेक मोठ्या सेलिब्रिटींची मिमिक्री करणाऱ्या कुशलची आईसुद्धा उत्तम मिमिक्री करते हे नुकतच एका कार्यक्रमातून समोर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुशलच्या विनोदाचं टायमिंग खूप भारी आहे, अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. कुशल बद्रिके नाटक, शो यानंतर सिनेमांमध्ये सुद्धा आपली छाप पाडत आहे. 
नुकताच त्याचा पांडू हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याचनिमित्ताने कुशल बद्रिकेने आपल्या पत्नी आणि संपुर्ण कुटुंबासोबत  होम मिनिस्टरमध्ये हजेरी लावली होती. 


कुशलसोबत त्याची पत्नी, आई आणि कुटुंबातील इतर व्यक्तींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. सगळ्यांनी यावेळी मजेदार आठवणी आणि किस्से शेअर केले.



त्यातच बोलताना कुशलच्या पत्नीने सासुबाईंबद्दलची एक मोठी गोष्ट उघड केली. आदेश बांदेकर यांनी  विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सुनैना बद्रीकेने आपल्या सासुबाई उत्तम अभिनय करतात असं म्हटलं. त्या खूप विनोदी आहेत. त्यांच्याकडूनच कुशलमध्ये विनोदी स्वभाव आला आहे असं मला वाटतं..
असं का वाटतं असा प्रश्न बांदेकरांनी सुनैनाला विचारला. याच उदाहरण देत तिने एक किस्सा शेअर केला. सुनैना म्हणाली, जेव्हा मी कुशलच्या घरी गेले, तेव्हा घरी कुणीच नव्हतं, मग कुशलच्या आई बाहेरुन आल्या आणि मला पाहिलं आणि म्हणाल्या काय गं कशी आहेस, मी या घरची कामवाली आहे. 


पुढे सुनैना म्हणाली, त्या म्हणाल्या मी या घरची काम वाली आहे, त्याची आई बाहेर गेली आहे.. ती येईल



नंतर आमच्या मित्राने मला सांगितला की ही कुशलची आई आहे. मग आमची ओळख झाली. पण त्याआधी आमची ओळख नव्हती.