मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट 'गेहराईया' लवकरच Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी दिपीका बाकी स्टारकास्ट अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासोबत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच, धैर्याव्यतिरिक्त, इतर चार स्टार्सनी एका मुलाखती दरम्यान चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये दीपिकाने स्वतःबद्दल एक मजेदार खुलासा केला होता. अभिनेत्रीने सांगितले की, एकदा एका कॉन्सर्टच्यामध्ये अभिनेत्रीला टॉयलेटला जायचं होतं. आणि महिलांच्या वॉशरूमच्या बाहेर खूप मोठी रांग होती. त्यामुळे ती पुरुषांच्या वॉशरूममध्ये गेली.दरम्यान आलिया भट्टही तिच्यासोबत होती.


मुलाखतीदरम्यान, दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला की, ती कोणत्याही परिस्थितीत पुरुषांचं वॉशरूम वापरु शकते का? अभिनेत्रीच्या उत्तरापूर्वी शकुन म्हणाला '100% दीपिका हे करुच शकते', अनन्या म्हणाली 'दीपिका अस्वच्छ असेल तर हे करू शकते', तर सिद्धांत म्हणाला की 'नाही ती हे करणार नाही'. यानंतर अभिनेत्रीने सांगितलं की ती हे करु शकते, मात्र तिने हे आधी एकदा केलंही आहे.


त्यानंतर दीपिका म्हणाली, 'जेव्हा मी हे केलं तेव्हा शकुन माझ्यासोबत होता. बर्लिनमध्ये एक कोल्डप्ले कॉन्सर्ट चालू होती आणि बाकी राहिलेल्या गाण्यात आम्हाला फारसा रस नव्हता. त्यावेळी आलियाही माझ्यासोबत होती. म्हणून आलिया आणि मी तिथून बाहेर आलो. आम्ही बाथरूममध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसलं की महिलांच्या वॉशरूमच्या बाहेर खूप मोठी रांग होती. हे पाहून आम्ही पुरुषांच्या वॉशरूमकडे धाव घेतली. स्वच्छता तर अजिबातच नव्हती, पण तेव्हा आमचं त्याकडे लक्ष नव्हतं. जर मला वॉशरुम वापरण्याची गरज असेल तर त्याचा मला काहीच फरक पडत नाही.