मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांचं आजही बॉलिवूडवर वर्चस्व आहे. त्यांनी त्यांच्या काळात अनेक हिट सिनेमे दिले, ज्यामुळे त्यांनी लाखो चाहत्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बिग बी तसे फारसे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नसतात. परंतु महत्वाच्या विषयावर ते आपलं मत नक्कीच मांडतात. बिग बी आपल्या आयुष्यात काय करतात आणि ते कधी एखादा प्रोजेक्ट किंवा सिनेमा घेऊन येतायत, यासाठी त्यांचे चहाते आतुरतेनं वाट पाहत असतात. या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांचा ट्रेंड होणारा हा व्हिडीओ 'कॉफी विथ करण' या शोचा आहे, ज्यामध्ये करण अमिताभ बच्चन यांना महिलांबद्दल प्रश्न विचारतो. पण त्याचे उत्तर अमिताभ नाही तर अभिषेक देतो आणि त्याचं उत्तर ऐकून अमिताभ देखील जोरजोरात हसायला लागतात. ज्यामुळे करणची देखील बोलती बंद होते आणि त्याला स्वत:च्याच प्रश्वावर हसण्याशिवाय पर्याय उरत नाही.


व्हिडिओमध्ये करण अमिताभ यांना विचारतो- 'तुम्ही सेक्सी आणि सुंदर महिलांबद्दल काय सांगु शकता?'  हा प्रश्व विचारताच अमिताभ बच्चन काहीवेळ गांगरतात. परंतु त्यांच्या या प्रश्वाचं उत्तर अभिषेक बच्चन देतो.


अभिषेक मजेशीररित्या म्हणतो की, 'त्यांचा 28 वर्षांचा मुलगा इथे आहे ना.' त्याच्या मजेशीर उत्तराने अमिताभ यांना या प्रश्वाचं उत्तर पुढे द्यावं लागत नाही आणि करण देखील शांत बसतो.


हा व्हिडीओ पाहून युजर्सने देखील अभिषेकचं कौतुक केलं आहे.


या व्हिडीओवर कमेंट करताना युजर्स, अभिषेकच्या विनोदबुद्धीचे कौतुक करु लागले. ज्यापद्धतीनं त्याने ही परिस्थिीती हाताळली आणि आपल्या वडिलांना या परिस्थीतून वाचवलं याला तोड नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिषेकबद्दल लिहिताना एका युजरनं म्हटलं की, 'मी त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल काही सांगू शकत नाही पण त्याचा विनोद अप्रतिम आहे'. दुसर्‍याने लिहिले, 'अभिषेकचा प्रेजेंस ऑफ माइंड आश्चर्यकारक आहे.' तर यावर आणखी एका यूजरने लिहिले - 'भगवान अभिषेक उत्साहित आहेत'. दुसऱ्याने लिहिले - 'अभिषेक खूप प्रतिभावान आहे आणि अगदी सरळ उत्तर देतो.'


हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच ट्रेंड होत आहे. लोकं या व्हिडीओला आपल्या मित्रांना देखील शेअर करत आहेत.