Viral : करण जोहरनं सलमान खानला सर्वांसमोर ऐश्वर्या राय नाव घेत डिवचलं! अशी होती भाईची रिॲरिक्शन
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत करण ऐश्वर्यावरुन सलमानची खिल्ली उडवताना दिसत आहे. ऐश्वर्या रायचं नाव ऐकताच ऑडियंसमध्ये बसलेले सगळेच जोर-जोरात हसू लागतात.
मुंबई : सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं अफेअर खूप चर्चेत असणाऱ्या रिलेशनशिपपैकी एक होतं. दोघंही एकत्र होते तेव्हा या नात्याची खूप चर्चा झाली आणि या जोडीचं ब्रेकअपही तितकंच चर्चेत होतं. सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं नातं 90 च्या दशकात आलेला सिनेमा 'हम दिल दे चुके सनम' शूटिंग दरम्यान सुरु झालं होतं. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. रिपोर्टनुसार हे कपल लग्नही करणार होतं.
करण जोहरने उडवली खिल्ली
सध्या सोशल मीडियावर एका जुन्या व्हिडीओची फार चर्चा आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ जरी जुना असला तरी या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ स्टार गिल्ड अवॉर्डवेळचा आहे. यामध्ये सलमान खान होस्टिंग करताना दिसत आहे. फिल्ममेकर करण जोहरला यावेळी सलमान प्रश्न विचारताना दिसत आहे. सलमान करणला प्रश्न विचारताना दिसत आहे की, जर त्याला कधी महिला बनायची संधी मिळाली तर तो कोणती हिरोईन बनायला आवडेल? आणि हा प्रश्न ऐकताच करणने लगेच ऐश्वर्या रायचं नाव घेतलं.
ऐश्वर्या रायचं नाव ऐकताच ऑडियंसमध्ये बसलेले सगळेच जोर-जोरात हसू लागले. यानंतर सलमानने करणला विचारलं की, ऐश्वर्याच का बनायचं आहे? यावर करणने सलमान खानवर ताशेरे ओढले आणि म्हणाला, ''तु कारण विचारतोयस का? तु कारण विचारतोयस.''
आम्ही तुम्हाला सांगतो की, दोघंही त्यांचं प्रेम खुलेपणाने व्यक्त करायचे. मात्र या दोघांचं ब्रेकअप खूप वेदनादायक आणि विवादास्पद होतं. 2002 मध्ये दोघंही वेगळे झाले. ऐश्वर्याने सलमानच्या वाईट सवयी म्हणजेच त्याचा राग आणि त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्याच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. स्वत: ऐश्वर्याने तिच्या जुन्या एका मुलाखतीमध्ये तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं होतं.
या मुलाखतीमध्ये बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, ''सलमान आणि मी गेल्या मार्चमध्ये एकमेकांपासून दुरावलो, पण तो अजूनही हे स्वीकारत नाहीये. आमच्या ब्रेकअपनंतरही तो मला फोन करायचा आणि विचीत्र बोलायचा. त्याला हे सतत वाटायचं की माझं माझ्या सहकलाकारांसोबत अफेअर आहे. अभिषेकपासून शाहरुख खानपर्यंत सर्वांशी त्याने माझं नाव जोडलं. सलमानने मला अनेकदा मारहाणही केली होती. सुदैवाने कोणतीही जखम त्यावेळी माझ्यावर झाली नाही. मी अशा अवस्थेतही कामावर जायचे जणू काही घडलंच नाही.''
एका मुलाखतीत सलमान खानला विचारण्यात आलं होतं की, ''त्याने कधीही कोणत्याही महिलेवर हात उचलला आहे का?'' यावर सलमान म्हणाला की, ''मी असं कधीच केलं नाही. जर मी कोणत्याही महिलेवर हात उचलला असता तर ती स्त्री जगू शकली नसती.''