मृत्यूला झुंज देताना मधूबाला यांना पाहून का हसायचे किशोर कुमार?
मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठं नाव होतं.
मुंबई : एककाळ असा होता जेव्हा लाखो लोकं मधुबाला यांचे चाहते होते. मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठं नाव होतं. त्याचबोरबर किशोर कुमार हे संगीत विश्वाचे बादशहा होते. दोघांची लव्हस्टोरी खूप सुंदर होती. ज्याचा शेवट मधुबाला यांच्या मृत्यूने झाला. मधुबाला आणि किशोर कुमार यांचं लग्न झालं तेव्हा मधुबाला बॉलिवूडच्या सुपरस्टार बनल्या होत्या. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी त्यांना हृदयात छिद्र असल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र किशोर कुमार यांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या दोघांचे परिवार कधीच त्यांच्यासोबत नव्हते. अभिनेत्रीच्या परिवाला लग्नासाठी तयार करण्यासाठी किशोर कुमार यांनी त्यांचं नाव आणि धर्म देखील बदलला होता. अखेर मधुबाला आणि किशोर कुमार यांच्या प्रेमापुढे प्रत्येकाला झुकावं लागलं आणि या दोघांनी लग्न केलं.
मात्र किशोर कुमार यांच्या घरच्यांनी अभिनेत्रीला कधीच एक्सेप्ट केलं नाही. मधूबाला यांची ट्रिटमेंट सुरु होती. मात्र तरीही त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. मिडिया रिपोर्टनुसार, किशोर कुमार यांनी आपली पत्नी मधूबाला कधीच एकट सोडलं नाही. मधूबाला ९ वर्ष आपल्या आजाराला झुंज देत होत्या. किशोर कुमार यांनी प्रत्येक दिवशी मधूबाला यांना मृत्यूशी झुंज देताना पाहिलं होतं.
एका मुलाखतीमध्ये बोलताना किशोर कुमार म्हणाले की, ''प्रत्येक क्षणाला एक्टिव्ह असणारी मधूबाला आराम करुन-करुन फ्रस्टेट झाली होती. मी प्रत्येक क्षणाला तिला हसवायचा प्रयत्न करायचो. मला डॉक्टरांनी असं करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी असंच करत राहिलो. जेव्हा ती हसायची मी पण खूप हसायचो जेव्हा ती रडायची मी पण खूप रडायचो. ९ वर्ष मृत्यूला झुंज दिल्यानंतर मधूबाला यांचं 1969 मध्ये निधन झालं.