मुंबई : नोरा फतेही तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि डान्समुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. पण आज नोरा फतेही कोणत्याही डान्स किंवा कोणत्याही फोटोमुळे चर्चेत आली नाहीये तर, आज नोरा तिच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच नोरा फतेहीने करीना कपूरच्या प्रसिद्ध चॅट शो 'व्हॉट वुमन वाँट'मध्ये तिच्या आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या करिअर संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. नोरा फतेहीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत खुलासा करत सांगितलं की,  ''एकदा कास्टिंग डायरेक्टरने मला घरी बोलावून खूप शिवीगाळ केली आणि ही गोष्ट मी ऐकल्यानंतर  भारत सोडणार होती कारण मला हे सगळं सहन होत नव्हतं.''


खरंतर प्रकरण असं आहे की जेव्हा नोरा फतेहीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला भारतात पाऊल ठेवलं तेव्हा तिला कोणी ओळखत नव्हतं त्यानंतर ती महिला दिग्दर्शक असलेल्या कास्टिंग डायरेक्टरला भेटली. ती नोराला म्हणाली की इथे तुझ्यासारखे बरेच लोक येतात मी थकली आहे प्रत्येकाला ओरडून-ओरडून. हे ऐकल्यानंतर नोराला फिल झालं की, तिने निघून जावं. यानंतर तिने आपली बॅग भरली आणि भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि तशी तिने तयारीही केली होती!


हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं आणि ती खूप रडलीदेखील कारण ती स्वत: तिच्याकडे गेली नव्हती. उलट तिने तिला तिच्या घरी बोलावलं होते. नोरा फतेही तिला अजिबात ओळखत नव्हती, असंही नोरा म्हणाली. अशा परिस्थितीत नोरा फतेही पुढे म्हणाली की, मला बोलवण्यासाठी तिने मला एकच फोन केला होता, तेव्हा ती या देशात नव्हती, यासाठी तिला असं वाटलं की, इथे तर प्रत्येकजण असा व्यवाहार करतो. घरी बोलवून तिच्यावर ओरडतं!