मुंबई : बॉलीवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत असंच दिसून येत. लग्नानंतर जेनेलिया कॅमेऱ्यापासून दूर असली तरी अनेक ठिकाणी तिला पती रितेश देशमुखसोबत स्पॉट करण्यात आले आहे. शिवाय जेनेलिया तिचे आणि रितेशचे फोटो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे क्यूट कपल जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतं तेव्हा क्यूट अंदाजात सर्वांचं मन जिंकून घेतात. आता देखील असचं झालं आहे. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवनच्या आगामी 'कुली नं १' चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये हे दोघे पोहोचले होते. पार्टीमधील रितेश-जेनेलियाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 



व्हिडिओमध्ये जेनेलियाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा चेक्सचा स्कर्ट घातला होता. जेनेलियावर हा ड्रेस फार आकर्षक दिसत होता. तर दुसरीकडे यावेळेस रितेशचा लूक देखील फार निराळा दिसून आला. व्हिडिओमध्ये त्याच्या केसांचा रंग आइस ब्लॉन्ड होता तर त्याचे ग्लास देखील चर्चेचा विषय ठरले.


याचदरम्यान जेव्हा फोटोग्राफर्सची दोघांवर नजर पडली तेव्हा सर्व फोटोग्राफर्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पुढे आले. फोटोसाठी पोज देताना फोटोग्राफर्स गंमतीत जेनेलियाला वहिनी म्हणून हाक मारत होते. तेव्हा जेनेलियाने त्यांना स्मितहास्य दिले. 
 
तर दुसरीकडे अभिनेत्री जेनेलिया देशमुखच्या चाहत्यांसाठी खुशखूबर आहे. लवकरच जेनेलिया बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने ही बातमी शेअर केली आहे. त्यामुळे आता लवकरच जेनेलियाला बिग स्क्रीनवर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.