मुंबई : बॉलिवूडमध्ये आपला दमदार अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडवर राज्य करणारी प्रियंका चोप्रा आता हॉलिवूड  स्टार बनली आहे. प्रियांका आज ज्या ठिकाणी आहे तिथं पर्यंतं पोहोचण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. आज ती तिच्या करिअरमध्ये यश झाली आगे आणि तिच्या सक्सेस सोबतचं तिच्यावर खूप प्रेम करणारा तिचा नवरा निक जोनासही तिच्यासोबत आहे. मात्र, एक काळ असा होता की प्रियांकाचे नाव बॉलिवूडच्या अनेक हिरोंसोबत जोडलं गेलं होतं. त्याचबरोबर असंही म्हणतात की, त्या कलाकारांच्या पत्नींनीही प्रियांकाला इंडस्ट्रीमधून बायकॉट करण्याचा प्रयत्न केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विंकल खन्ना
एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरने संपूर्ण बॉलिवूड हादरवून गेलं होतं.. दोघांची जोडी पडद्यावर चांगलीच हिट झाली होती. त्याचवेळी, या दोघांच्या अफेअर्सच्या बातम्या देखील फिरु लागल्या की, या बातमीने ट्विंकल आणि अक्षयच्या विवाहित जीवनात खळबळ उडाली. असं म्हणतात की, अक्षयने प्रियांकासोबत काम करावं अशी ट्विंकलची इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत अक्षयने प्रियांकापासून आपल्या घराची शांतता कायम ठेवण्यासाठी अंतर ठेवलं आणि त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही



सुजैन खान
आज जरी सुझान आणि हृतिक रोशन वेगळे झाले आहेत, मात्र एकेकाळी ती त्यांची पत्नी होती. हृतिक आणि प्रियांकाच्या अफेअरची बातमी फारशी उघडकीस आली नाही, पण असं म्हटलं जातं  की, क्रिश चित्रपटाच्या दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. याबद्दल सुझान खूप नाराज होती. अशा परिस्थितीत हृतिकने प्रियंकाबरोबर काम करणार नाही असा निर्णय घेतला होता. त्याचवेळी ऑफ कॅमेरा देखील हृतिक प्रियंकापासून दूर राहू लागला.



गौरी खान
शाहरुख आणि प्रियांकाची लव्हस्टोरी कुणापासून लपलेली नाही. डॉन चित्रपटादरम्यान शाहरुख आणि प्रियांका एकमेकांच्या खूप जवळचे आले होते. या बातमीनंतक शाहरुखची पत्नी गौरी नरवस झाली होती. गौरीला माहित होतं की शाहरुख एक रोमान्स किंग आहे आणि बर्‍याच अभिनेत्रींसोबत तो स्क्रिनवर रोमान्स करतो, पण त्याचा प्रियांकाबरोबरचा रोमान्स तिला आवडला नाही. आणि याचा गौरीला त्रास देखील झाला होता, त्यानंतर शाहरुखने स्वत: ला प्रियांकापासून दूर केलं.



असं म्हणतात की, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव प्रियंकाच्या करिअरवर झाला. त्यावेळी सगळेच दिग्दर्शक अक्षय, हृतिक आणि शाहरुख सारख्या कलाकारांसोबत काम करायला ईच्छुक होते. त्या अनेक दिग्दर्शकांनी प्रियांकाला त्यांच्या चित्रपटात घेणं बंद केलं होतं. मात्र, प्रियांकाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्यानंतर ती हॉलिवूडमध्ये गेली आणि अनेक हिट मालिका आणि चित्रपटांचा ती एक भाग झाली. आज प्रियंका ग्लोबल स्टार असून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट होतात.