मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या 'मर्दानी २' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. प्रमोशन दरम्यान ती अभिनेता सलमान खानला चक्क 'ज्युनियर' म्हणाली आहे. सलमानला ज्युनियर म्हणणारी राणी 'मर्दानी २ ' चित्रपटात ती एका निर्भीड पोलीसाची भूमिका बजावताना दिसत आहे. महिलांवर होणारे अत्याचार, महिलांची सुरक्षा संबंधतीत विषयांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, तिने पोलीस अधिकाऱ्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींग ठेवले होते. स्क्रिनींगनंतर मध्यमांसोबत संवाद साधताना तिने सलमानचा ज्युनियर म्हणून उल्लेख केला. 'शिवानी रॉय आणि चुलबुल पांडेमध्ये एक अंतर आहे आणि ते अंतर स्टारचं आहे.' ती पोलिसांच्या वर्दीला असणाऱ्या स्टारमुळे ती सलमानला 'ज्युनियर' म्हणाली आहे. 



राणी मुखर्जी ही सलमान खानपेक्षा वरिष्ठ आहे. कारण 'दबंग ३' चित्रपटात चुलबुल पांडे २ स्टार ऑफिसर आहे. सलमान खान देखील त्याच्या 'दबंग ३' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या आहे. 


चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. ‘मर्दानी २’ चित्रपट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'यशराज फिल्म'च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत.