मुंबई : सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी सिनेमा  किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेता त्याच्या प्रमोशनमुळे व्यस्त आहेत.  या सिनेमातून पलक तिवारी आणि शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या दोघींना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.  'किसी का भाई किसी की जान' शिवाय तो 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा रिलीज होण्याआधी बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी पलक तिवारीने केलेल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत आली होतीय यावंर बराच वादही रंगला होता. यावेळी पलक बोलताना म्हणाली होती की, सेटवर छोटे कपडे घालण्यासाठी परमिशन नाही आहे.  मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर छोटे कपडे न घालण्याचा सल्ला सलमान देतो. तसं, सलमानबद्दल अशा अनेक बातम्या आल्या आहेत की, त्याला एखाद्या अभिनेत्रीला छोट्या कपड्यांमध्ये पाहणं आवडत नाही.


असाच काहीसा प्रकार अभिनेत्री कतरिना कैफसोबत घडल्याचा समोर आला आहे. एक था टायगर सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्रीसोबत असाच काहिसा प्रकार घडला होता. एका रिपोर्टनुसार त्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सलमानने एक था टायगरच्या सेटवर कतरिनाच्या कानाखाली थप्पड लगावली होती. यावेळी कतरिनाने छोटे कपडे परिधान केले होते. सलमान व्हॅनिटीच्या बाहेर थांबून हिरोईनची वाट पाहत होता. जेव्हा कतरिना बाहेर आली तेव्हा तिच्या ड्रेसमधून क्लिवेज स्पष्टपणे दिसत होते. तिने घातलेला ड्रेस खूपच लहान होता. 


सलमान खानने यावेळी कतरिनाला विचारलं की, तिने एवढे रिवलींग कपडे का घातले आहेत. यावंर कतरिना म्हणाली डायरेक्टरची डिमांड आहे. यावर सलमान म्हणाला होता की, दिग्दर्शक त्याचं तो बघून घेईल. एवढंच नव्हेतर भाईजानने कतरिनावर हातही उचलला होता. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. पण व्हायरल झालेली ही बातमी पुर्णपणे अफवा आणि खोटी असल्याचं बोललं जावू लागलं.


या चित्रपटात सलमान आणि पूजा व्यतिरिक्त शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.