विकीसमोरचं कतरिनासाठी सलमानने केली ही गोष्ट; पाहून तुमचेही डोळे पाणावतील
सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याबद्दल बी-टाऊनमध्ये खूप चर्चा होत असतात. चाहत्यांना ही जोडी पडद्यावर तर आवडतेच, पण ही जोडी खऱ्या आयुष्यातही व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. पण...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) एकमेकांसोबत खूप खुश आहेत. ते त्यांचं वैवाहिक जीवन आनंदाने घालवत आहेत. कतरिना कायमच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. कधी सलमान खान तर कधी रणबीर कपूर आणि कधी विक्की कौशल. कतरिनाच्या या अफेअर्समुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कतरिना यावेळी सलमानमुळे चर्चेत आली आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याबद्दल बी-टाऊनमध्ये खूप चर्चा होत असतात. चाहत्यांना ही जोडी पडद्यावर तर आवडतेच, पण ही जोडी खऱ्या आयुष्यातही व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. पण तसं काही होऊ शकलं नाही आणि कतरिनाने विकी कौशलशी लग्न केलं. मात्र, कतरिनाच्या लग्नानंतरही सलमान खानचं तिच्याशी खास नातं आहे.
सलमानचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो विकी कौशलसमोर कतरिनासाठी गाणं गाताना दिसत आहे. लग्नानंतर कतरिना 'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.. या सगळ्यामध्ये सलमानचा एक थ्रोबॅक व्हिडिओही व्हायरल होत आहे. . विशेष म्हणजे, व्हिडीओमध्ये सलमान खान एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये विकी कौशलसमोर कतरिनासाठी हार्ट ब्रेकिंग गाणं गाताना दिसत आहे.
सलमाननेच कतरिनाला बॉलिवूडमध्ये दिला मोठा ब्रेक.
या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये सलमान खानने कतरिना कायमची गमावल्याचे व्यक्त होत असल्याच्या या व्हिडिओवर नेटिझन्सही तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. जरी चित्रपट कलाकार त्यांच्या ब्रेकअप आणि घटस्फोटातून सावरले असले तरी त्यांचे चाहते यातून कधीच बाहेर पडत नाहीत आणि हे उदाहरण त्याचा पुरावा आहे.
तसं, सलमान खाननेच कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला आणि त्यानंतर अभिनेत्रीने कधी मागे वळून पाहिलं नाही. मात्र, यासाठी कतरिना नेहमीच सलमानचे आभार मानते.
सलमान कतरिनाचे एकत्र सिनेमे
सलमान आणि कतरिना (Salman And Katrina) ने 'मैंने प्यार क्यों किया', 'युवराज', 'एक था टाइगर', 'टाइगर जिंदा है' आणि 'भारत' सारख्या सिनेमात एकत्र काम केलंय. लवकरच हे दोघं 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. यासोबतच कतरीना (Katrina Kaif) 'फोन भूत' आणि 'सूर्यवंशी' सारख्या सिनेमातही झळकली आहे.