मुंबई : सध्या अभिनेता संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट 'प्रस्तानम'च्या प्रमोशनमध्ये फार व्यस्त आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत 'ड्रीम गर्ल' पूजा सोबत गप्पा मारताना तो दिसत आहे. संजुबाबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो 'ड्रीम गर्ल' पूजासह भेटण्याची वेळ ठरवताना दिसत आहेत. परंतू समोर कॅमेरा असल्याचे कळताच तो गोंधळून गेला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ चित्रपट निर्माती एकता कपूरच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा गंमतीदार व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मुन्ना भाई देखील ड्रीम गर्ल' सोबत गप्पा मारण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.' असे लिहिले आहे. 


ही 'ड्रीम गर्ल' दुसरी तिसरी कोणी नसुन चक्क अभिनेता अयुषमान खुराना आहे. 'ड्रीम गर्ल' चित्रपटात तो पूजा नामक एका मुलीचा आवाज काढत सर्वांशी बोलताना दिसत आहे. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे,
 
चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशीष सिंह करत आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.