मुंबई : देसी क्वीन सपना चौधरीने हरियाणवी डान्सर ते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास सांगितला आहे. नुकताच सपना चौधरीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांचे डोळे पाणवतील येवढं मात्र नक्की. या व्हिडिओमध्ये सपना चौधरीने तिच्या १३ वर्षांच्या कठीण करिअरबद्दल सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओच्या माध्यमातून तिने मजबुरीमुळे तरुण वयात या क्षेत्रात कसं यावं लागलं आणि कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितलं आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला सपना चौधरी म्हणताना दिसत आहे की, तिने आतापर्यंत  लोकांचं खूप बोलणं ऐकून घेतलं आहे. खूप काही पाहिलं आहे, या प्रवासात आयुष्याने अनेक रंग दाखवले आहेत.


सपना चौधरीने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, मलाही शाळेत जाऊन शिक्षण घेवून चांगलं काम करायचं होतं. पण मी लहान असताना माझे वडील आजारी पडले आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर घरात एकही कमवणारं उरलं नाही. यामुळेच मला या लाईनमध्ये काम करावं लागलं.


या व्हिडीओमध्ये बोलताना सपना खूपच भावूक होते आणि म्हणते की, जेव्हा मी डान्स करायचे तेव्हा लोकं मला वेगवेगळ्या प्रकारे टोमणे मारायचे. लोकं तिला नाचणारी म्हणायचे. जेव्हा डान्समुळे माझा संसार चालतो. माझी आई, माझी बहीण आणि भाऊही चांगलं जीवन जगतायेत तर मला याचं दु:ख नाही. सपना चौधरीने तिची वेदनादायक कथा सांगताना चाहत्यांचे आभार मानले. 13 वर्षांचा प्रवास सपनासाठी खूप संस्मरणीय होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाने सगळं दुःख विसरल्याचं सपनाने सांगितले. सपनाने सांगितलं की, जेव्हा ती रात्री 2-2 वाजता बस आणि ऑटोने शो करुन घरी परतायची तेव्हा लोकं तिला घाण-घाण बोलायचं. माझ्या मनात  अनेक गोष्टी आहेत ज्या मी वर्षानुवर्षे माझ्या मनात साठवून ठेवल्या आहेत. लोकांना सल्ला देत सपना म्हणाली की, काहीही झालं तरी आयुष्यात कधीही हार मानू नये.