मुंबई : जेव्हा पण आपण कोणतं साहसी काम करतो तेव्हा थोडी भीती वाटते. अशावेळी आपण आपल्या जवळच्या लोकांना आठवतो. त्यांच्या नावाने ओरडायला सुरूवात करतो. असंच काहीसं सैफ अली खानच्या मुलीसोबत सारा अली खानसोबत झालं आहे. झालं असं की, सारा अली खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अॅडवेंचर स्पोर्टसचा व्हिडिओ शेअर केला आहे. सारा या व्हिडिओत एका व्यक्तीचं नाव मोठ्या घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खान या व्हिडिओत मोठ मोठ्याने ओरडत आहे. सुरूवातीला कळतं नाही पण सारा या व्हिडिओत आपली आई अमृता सिंहला मोठ्याने आठवत आहे. सध्या सारा आपल्या सिंबा या सिनेमाच्या शुटिंगकरता स्वित्झरलँडमध्ये व्हिडिओ करत आहे. या दिवसांत तिच्या फोटोत एक खास चेहरा सहभागी आहे. 


काय आहे या व्हिडिओत 



या व्हिडिओत सारा पॅरोग्लायडिंग करताना दिसत आहे. पॅराग्लायडिंग करताना तिच्या हेल्परने कॅमेरा ऑन केला तेव्हा साराने सुरूवातीला स्टील फोटोसाठी पोझ दिली. मात्र जेव्हा हेल्परने सांगितलं की, जेव्हा हा व्हिडिओ मी बनवत होतो तेव्हा सारा खूप एक्साइटेड होती. तिने यावेळी आपल्या आईची आठवण काढली तसेच ती यावेळी खूप एन्जॉय करत होती. एवढंच नव्हे तर सारा या व्हिडिओत परिसरातील नदी आणि हिरवळीचं कौतुक करत आहे.