मुंबई : 'थप्पड से डर नही लगता सहाब... प्यार से लगता है...' या एका डायलॉगने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकताचं एका सत्रात सोनाक्षीला चाहत्यांनी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. यावर तिने उत्तर देखील दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्याच्या प्रश्नांचं उत्तर देताना ती म्हणाली, 'सर्वांना कोरोना होत आहे? मला पण कोरोनाची लागण व्हावी असं वाटत आहे का?' त्यामुळे सोनाक्षी कधी लग्न करणार यावर अद्याप काही कळालेलं नाही. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनाक्षी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. सोनाक्षीच्या बॉयफ्रेन्डचं अभिनेता सलमान खान आणि खान कुटुंबासोबत खास कनेक्शन आहे. सोनाक्षीच्या बॉयफ्रेन्डचं नाव बंटी सजदेह (Bunty Sajdeh) आहे.



एवढंच नाही तर सोनाक्षी आणि बंटी लवकरचं लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. बंटी सजदेहचे खान कुटुंबाशी खास नाते आहे. बंटी हा सलमान खानचा धाकटा भाऊ, सोहेल खानची पत्नी सीमा खानचा भाऊ आहे, म्हणजेच तो सोहेल खानचा मेहुणा आहे.


बंटी सजदेह विवाहित असून 2009 मध्ये गोव्यातील अंबिका चौहानसोबत त्याचा विवाह झाला होता. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सलमानने सरप्राईज एन्ट्री केली. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. चार वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.