Viral Video : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. पण त्या दोघांपैकी कोणी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेच्या बातम्यांना दुजोरा दिला नाही. मात्र, जेव्हा जया बच्चन यांना रिलेशनशिपबद्दल माहिती होईल, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आतापर्यंत दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. असे अनेक वेळा घडले की एकाच ठिकाणी आले पण दोघांनी एकमेकांना पाहिले देखील नाही. परंतु एका वेळी असं घडलं की रेखा अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहताच पळू लागल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखा यांचा पळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेखा या पापाराझींना वेगवेळ्या लूकमध्ये पोज देत होत्या. त्यावेळी त्यांची अचानक नजर मागे असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर जाते. त्याच वेळी रेखा तेथून निघून जातात. 


पाहा व्हिडीओ



अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम 


रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी 11 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. परंतु, त्यानंतर ते दोघे परत कधीच एकत्र काम करताना दिसले नाहीत. 2015 मध्ये रेखा यांचा अमिताभ बच्चन यांच्या 'शमिताभ' चित्रपटात एक छोटा सीन होता. ज्यावेळी रेखा यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यावेळी रेखा यांनी म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे ही खूप मोठी गोष्ट आहे, असं रेखा यांनी म्हटलं होतं. 


एकदा रेखा यांनी बोलता बोलता अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रेमाची कबुली दिली होती. 2021 मध्ये रेखा या इंडियन आइडलच्या सेटवर प्रमुख पाहुण्या म्हणून गेल्या होत्या. त्यावेळी शोचे होस्ट जय भानुशाली यांनी म्हटले होते की, रेखा जी, नेहा कक्कड़ यांना तुम्ही कधी पाहिले आहे. एक महिला विवाहित पुरुषासाठी पागल झाली आहे. त्यावर रेखा यांनी लगेच म्हटले की, मला विचाराना, हे ऐकताच जय अस्वस्थ झाले. त्यानंतर रेखा म्हणाल्या की, मी काही केलं नाही. 


असं म्हटले जात आहे की, जेव्हा जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रिलेशनशिपची माहिती झाल्यानंतर रेखा यांना घरी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नवऱ्यापसून दूर राहण्यास सांगितले होते.