तुम्ही `हा` फोटो अनेकदा पाहिला असेल, पण ही व्यक्ती कोण?
बॉलिवूडला मायानगरी बोललं जातं ते काही चुकीचं नाही.
मुंबई : बॉलिवूडला मायानगरी बोललं जातं ते काही चुकीचं नाही.
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडमध्ये कशा पद्धतीने ऑडिशन घेतलं जातं ते चित्र समोर मांडणारा हा फोटो असल्याचं सांगितलं जातं होतं.
या फोटोत एक महिला उभी असून ती कपडे घालण्याचे आणि काढण्याचे काम करत आहे. तिच्यासमोर 2 पुरूष उभे आहेत. तसेच त्यांच्या आजूबाजूला अनेक पोस्टर्स आहेत. या फोटोबाबत असं सांगितलं गेलं की, 50 व्या दशकात अशा पद्धतीने मुली सिनेमाकरता ऑडिशन देत असतं. मुलींना दिग्दर्शक आणि निर्मात्यासमोर कपडे घालावे लागत असतं. तसेच त्यांना छोटे कपडे घालावे लागत असतं. आणि अनेक गोष्टी मुलींना कराव्या लागत असतं.
हे करण योग्य आहे का?
या फोटोच्या व्हायरल होण्यामागे असा प्रश्न विचारला गेला की, जे काही हे होतं होतं ते योग्य आहे का? तेव्हा असं उत्तम मिळालं की, हो... या फोटोत उपस्थित असलेल्या त्या दोन्ही व्यक्तींची ओळख कळली. त्या फोटोत एक व्यक्ती दिग्दर्शक आणि दुसरी व्यक्ती निर्माता आहे.
फोटोतील त्या दोन व्यक्तींची ओळख पटली
या फोटोत ज्या दोन व्यक्ती आहे. त्यातील जे दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव अब्दुल राशिद कारदार. हे पाकिस्तानमधील पहिले टेस्ट कॅप्टन अब्दुल कारदार यांचे सावत्र भाऊ आहेत. अब्दुल कारदार यांनी ''कारदार प्रोडक्शन'' नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. तिथे स्टुडिओ बनवून त्याला अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं. या स्टुडिओबद्दल असं बोललं जातं की, हा पहिला असा स्टुडिओ होतो जिथे मेकअप रूममध्ये देखील एसी लावला होता.
हे तेच अब्दुल राशिद कारदार आहेत ज्यांनी केएल सहगल यांच्यासोबत सिनेमा केला आहे. या सिनेमाचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. मजरूह सुल्तानपुरी यांनी याच सिनेमातून गाणे लिहिण्यास सुरूवात केली होती.
कोण आहेत हे अब्दुल कारदार?
अब्दुल राशिद कारदार भारताच्या त्या भागात जन्माला आले जो भाग पुढे पाकिस्तानात गेला. 1920 च्या सुरूवातीला उत्तर - पश्चिम रेल्वेमध्ये काम करणाऱ्या जी के मेहता लाहोरमध्ये एक कॅमेरा घेऊन पोहोचले हा कॅमेरा इंगल्डहून आणला होता. मेहताने कारदार यांना सिनेमा बनवताना सांगितलं की मला असिस्ट कर. बघता बघता कारदार असिस्टेंड डायरेक्टर झाले. त्यानंतर त्यांनी सिनेमांत काम देखील केलं. 1920 मध्ये लाहोरमध्ये पहिला सायलेंट सिनेमा रिलीज झाला त्याचं नाव होतं Daughters of Today असं होतं या सिनेमांत कारदार यांनी अभिनय देखील केला होता.
कारदार हे फक्त महिलांनाच स्टुडिओत बोलवून कपडे काढण्यास सांगतील नाही. तर त्यांनी या सिनेसृष्टीला एकाहून अधिक उत्तम कलाकार दिले आहे. मोहम्मद रफी या मोठ्या व्यक्तीचं पहिलं हिट गाणं 'सुहानी रात ढल चुकी' कारदार यांच्या 'दुलारी' सिनेमांत गायलं होतं. पहिला पद्मश्री मिळवणाऱ्या महेंद्र कपूर यांना कारदार यांनी आपल्या पहिल्या टॅलेंट शोमध्ये काम दिलं होतं.