मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) हिने निक जोनसशी (Nick jonas) लग्न करून संसाराला सुरुवात केलीये. प्रियांकाचे फक्त भारतातच नव्हे तर जगातील इतर अनेक देशांत चाहते आहेत. प्रियांका आणि निक यांनी उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. अलीकडेच प्रियांकाने इटालियन ब्रँडच्या पत्रकार परिषदेत लग्नाविषयी अनेक खुलासे केले. प्रियांका म्हणाली की, दोघांच्या लग्नातील खर्च एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी केला गेला होता. प्रियांका आणि निक यांनी लग्नाचा खर्च शेअर केला. होय, फक्त एकच गोष्ट होती, जी शेअर केलेली नव्हती. (Royal wedding of Priaynaka chopra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका चोप्राने सांगितले की निकने तिच्यासाठी अंगठी आणली होती. प्रियांका आणि निकच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत आणि वेळोवेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अभिनेत्री म्हणाली, "जोडप्यांनी लग्नाच्या तयारीपासून जबाबदाऱ्या वाटून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. यामध्ये दागिन्यांची खरेदी, कपड्यांची खरेदी आणि बरेच काही समाविष्ट आहे. या लग्नावर 3 कोटीहून अधिक खर्च करण्यात आले होते.


प्रियांका आणि निकच्या भव्य लग्नाची छायाचित्रे आणि व्हिडीओने त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली. लवकरच प्रियांका 'जी ले जरा' सिनेमामध्ये मध्ये दिसणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.


प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. अलीकडेच तिने पती निकसोबत बीचवर विश्रांती घेतानाचे फोटो शेअर केले, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.