मुंबई : 'बिग बॉस चाहते हैं...' हा आवाज बिग बॉस शोच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. शोच्या प्रत्येक सीझनमध्ये हा आवाज ऐकायला मिळतो. पण हा आवाज कोणाचा आहे हे अनेकांना माहित नसेल. या आवाजामागे आहेत अतुल कपूर. हा एकमेव आवाज आहे, जो ऐकल्यानंतर स्पर्धक पूर्ण उत्साहाने आणि उत्कटतेने घरातील त्यांची कामे करतात. हा आवाज त्यांना खडसावतो आणि हा आवाज शोमध्ये त्यांचे स्वागतही करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला माहीत आहे का की अतुल कपूर बिग बॉस शोमध्ये फक्त हा एक आवाज देण्यासाठी किती मानधन घेतात? इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अतुल कपूर प्रत्येक सीझनसाठी 50 लाख रुपये घेतात. बिग बॉसचा 16 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे.


बिग बॉसच्या घरात उपस्थित स्पर्धकांना नियंत्रणात ठेवण्याचे काम बिग बॉसचा आवाज करतो. अतुल कपूरची एक खास गोष्ट म्हणजे त्याची भाषा आणि बोलण्याची शैली अगदी अचूक आहे. इतकेच नाही तर अतुल कपूर मार्व्हलच्या 'आयर्न मॅन 2', 'आयर्न मॅन 3' आणि 'अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रान' या मार्व्हल चित्रपटांमधील 'जार्विस' या पात्रांना ही आवाज देतात.



अतुल कपूर हे व्हॉईसओव्हर आर्टिस्ट आहेत. अतुल यांनी 2002 पासून व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर अतुल कपूर यांना 2006 मध्ये 'बिग बॉस'मधून ब्रेक मिळाला. तेव्हापासून ते या शोशी जोडले गेले आहेत. त्यांचा आवाज प्रेक्षकांना इतका आवडला की ते शोचे 'किंग' बनले. याशिवाय गेल्या 12 वर्षांपासून सलमान खान हा शो होस्ट करत आहे. प्रत्येक वळणावर मेकर्स होस्टिंगसाठी त्याच्याकडे जातात. यावेळीही तेच केले. सलमानला आता हा शो होस्ट करायचा नसला तरी शोच्या निर्मात्यांकडे सध्या दुसरा पर्याय नाही.