Karan Johar : लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. करण नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकताच त्यानं त्याची लेक रुहीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहरची लेक खूप चांगल्या पद्धतीनं फोनला कमांड देताना दिसते. त्याचाच व्हिडीओ करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रुही सिरीला कमांड देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत करणनं कॅप्शन दिलं की रुही विरुद्ध सिरी. अनेकांना रुहीचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. त्याचं कारण म्हणजे एवढ्या कमी वयात कोणी इतक्या चांगल्या प्रकारे बोलू शकतं याचं सगळ्यांना आश्चर्य होतं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंटही केल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आयुष्मान खुरानानं हसायचं इमोजी शेअर केलं आहे. श्वेता बच्चननं देखील 'मिको, अग्रदूत होते' असं म्हटलं आहे. त्यांच्या शिवाय अनेक सेलिब्रिटींनी हसण्याचे इमोजी आणि हार्ट इमोटिकॉन वापरले आहेत. त्यात सबा पतौडी, नीलम कोठारी यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटी आहेत. त्याशिवाय एक नेटकरी म्हणाली, 'प्रोफेशन्ल हो, यावयातल्या मुलांना प्रोफेश्नल हा शब्द माहितीये याचं आश्चर्य आहे. अर्थातच माहित असणार शेवटी ती करण जोहरची मुलगी आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सुराग गा... हे मला सगळ्यात जास्त आवडलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गूगलला वेड लागलं.'



सेलिब्रिटी आणि सगळ्या कमेंट्समध्ये एका कमेंटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नेटकऱ्यानं थेट या व्हिडीओवर कमेंट करत विचारलं की 'रूहीची आई कोण आहे? हे मला कोणी सांगू शकतं का? कारण माझा गोंधळ होतो किंवा मला कळत नाहीये.' त्या नेटकऱ्याची ती कमेंट पाहता करणनं त्याच्या शब्दात सडेतोड उत्तर दिलं आहे. करण यावेळी म्हणाला की 'मी आहे. तुझ्या या गोंधळाला पाहता मी चिंतेत आहे. त्यामुळे मी तुझ्या या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यावे लागले.'


हेही वाचा : अरबाज खानचा मुलगा अरहान आणि सावत्र आईचा 'तो' VIDEO VIRAL! दोघांना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले...


दरम्यान, 2017 मध्ये करण जोहरची दोन्ही मुलं यश आणि रुहीचा जन्म झाला. करणनं सरोगसीच्या मदतीनं जुळ्या मुलांचा बाप झाला. करण जोहर यांची आई हीरू जोहर यश आणि रुहीचे संगोपण करतात. गेल्या सोमवारी करण जोहरनं राखीच्या निमित्तानं त्या दोघं भाऊ-बहिणींचा एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. दुसरीकडे रुही आणि यशचे व्हिडीओ जे करण शेअर करतो ते सगळ्यांच्या पसंतीस उतरतात.