मुंबई : मागील काही महिन्यांपासून बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांनी त्यांच्या नात्याला नवं नाव दिलं. राजरुमार रावपासून ते अगदी विकी कौशलपर्यंत सर्वांनीच आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधत एक नवा प्रवास सुरु केला. त्यातच आता आणखी एका जोडीचीही भर पडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जोडी म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा प्रियकर सूरज नांबियार याची. 


मौनी आणि सूरज 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. मुख्य म्हणजे सूरज आणि मौनी लग्न करण्याच्या आधीपासून आता हा मुलगा आहे तरी कोण हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला आहे. 


चला तर मग, पाहूया मौनीच्या होणाऱ्या पतीबाबतची काही खास माहिती 


सूरज नांबियार दुबईमध्ये एक व्यायसायिक आहे. त्याचा जन्म बंगळुरूमध्ये झाला होता. 


जैन इंटरनॅशनल रेसिंडेंशियल स्कूल बंगळुरू येथून त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर, आरवी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून त्यानं उच्चशिक्षण पूर्ण केलं. 


पुढील शिक्षणासाठी तो परदेशात गेला. कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यानं इंवेस्टमेंट सायंस अँड इंटरनॅशनल मॅनेजमेंटचा कोर्स केला. 


अशोका इंडियातून त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. एका इवेंटमध्येच सूरज आणि मौनीची मुलाखत झाली होती. 


सुरुवातीच्या मैत्रीनंतर या दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 




मौनीकडून अद्यापही या नात्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. पण, तिला सूरजसोबत अनेक पार्टींमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे. 


सूरजचा लूक आणि त्याचं एकंदर व्यक्तीमत्त्वं पाहता तो रणवीर आणि रणबीर या बॉलिवूड कलाकारांही टक्कर देतोय असं म्हणायला हरकत नाही. 


सूरज आणि मौनीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री तर आता काहीजणांनीह पाहिली. पण, सरतेशेवटी चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे त्यांच्या एका अधिकृत फोटोची. जिथं यांची केमिस्ट्री सर्वांनाच पाहता येईल.