Arbaaz Khan Shura Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. अरबाज खान प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. अशातच आता अरबाजच्या लग्नासाठी रविना टंडन पासून यूलिया वंतूर पर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. मात्र, अरबाजची होणारी दुसरी पत्नी (Who is Shura Khan) आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शूरा खान आहे तरी कोण? 


अरबाज खान शूरा खानसोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास तयार आहे. शूरा खान एक व्यावसायिक बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट आहे. शुरा आणि अरबाज खानची 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर भेट झाल्याचे म्हटले जात आहे. बी-टाउन मेकअप आर्टिस्ट म्हणून ती प्रसिद्ध आहे. बॉलिवूडवर सर्वांची नजर असते मात्र, अरबाजचं शूरासोबतचं नातं कोणालाच माहीत नव्हतं. 


शूरा खान ही रवीना टंडन आणि तिची मुलगी रशा थडानी यांची व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. जेव्हा अरबाज खान जॉर्जियासोबत रिलेशनशीपमध्ये होता, तेव्हा शूरा आणि अरबाज यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, दोघं डेट करत असल्याची माहिती कोणालाही नव्हती.


अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांचा अधिकृत घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा असून नाव अरहान खान असं त्याचं नाव आहे. अरबाज खानचे आई आणि वडीलही अर्पिता खानच्या घरी पोहोचले आहेत. या खास प्रसंगी सलीम खान अगदी सिंपल लूकमध्ये दिसले तर आई सलमा रंगीत सूटमध्ये दिसली.



दरम्यान, अरबाजच्या लग्नात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड युलिया वंतूर देखील सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी अभिनेत्री काळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. शूरा खान सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मात्र, आता ती बॉलिवूडमधील सर्वात मजबूत घराण्यात सामील झाल्याने तिच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.