Satyaprem Ki Katha: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सत्यप्रेम की कथा या चित्रपटाची. या चित्रपटातून अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन भुलभुलैया 2 या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाचा डिरेक्टर हा एक मराठमोळा दिग्दर्शक आहे. हा दिग्दर्शक मराठीतला मोठा दिग्दर्शक आहे. त्यानं मोठ्या नामवंत मराठी कलाकारांसोबत काम केली आहेत. या दिग्दर्शकाचे नावं आहे समीर विध्वंस. समीर विध्वंस यांची बायकोही लेखिका आहे. त्यांचे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा असते. काही दिवसांपुर्वी दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी कार्तिक आर्यनसोबतच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरून अनेकांना हिंट मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर विध्वंस यांनी आत्तापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन केेले आहे. 'टाईमप्लीज', 'आनंदी गोपाळ', 'मला काहीच प्रोब्लेम नाही', 'डबल सीट', 'समांतर', 'धुरळा', 'YZ' अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शन-लेखन केलं आहे. त्यामुळे अनेकदा त्यांची चर्चा रंगलेली असते. त्यांच्या आनंदी गोपाळ या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यातून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची पत्नी इरावती कर्णिक या देखील लेखिका आहेत आणि त्यांनी एक चित्रपट हे एकत्र केले आहेत. मराठी सिनेसृष्टीतही त्यांची फार चर्चा रंगलेली असते. सध्या आता समीर विद्धंस यांच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. 


हेही वाचा - सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा


मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलाकार यांनी त्यांना त्यांच्या या नव्या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे. येत्या 29 जूनला सत्यप्रेम की कथा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येता आहे. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगलेली आहे. यावेळी कार्तिक आणि कियाराची जोडी पुन्हा एकदा भाव खाऊन जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 



मराठी कलाकारही आता हिंदीमध्ये आपला डंका वाजवता दिसत आहेत. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनीही 'बेन्जो' या त्यांच्या हिंदी चित्रपटानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सई ताम्हणकरचा मिम्मी ही चित्रपटही फार गाजला होता. त्याचसोबत आता रवी जाधव यांचा 'ताली' आणि 'अटल' हे दोन मोठे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.