अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिक साठी लागणार कोणाची वर्णी
राकेश शर्मा यांच्या रोल साठी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती.
मुंबई: अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर सिनेमा बनत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.बायोपिक साठी कोणात्या अभिनेत्याची वर्णी लागणार हे अद्याप ठाऊक नाही. राकेश शर्मा यांच्या रोल साठी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती. अमिर खान नंतर सिनेमासाठी शाहरुख खानच्या नावाची चर्चा होती, पण आता शाहरुख खान सुध्दा सिनेमात दिसणार नाही. अमिर खान याने अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिक साठी शाहरुख खानच्या नावाची कल्पना दिली.सूत्रांच्या सांगण्यानुसार शाहरुख खानने सुध्दा सिनेमासाठी नकार दिला आहे. डिसेंबर 2018 मध्ये शाहरुख सिनेमाचं शूटिंग सुरु करणार अशी चर्चा होती.
पण झिरो सिनेमाच्या प्रदर्शनामुळे त्याला नवा सिनेमा हाती घेता आला नाही. सिनेमामध्ये दंगल गर्ल फातिमा सना शेख सुध्दा झळकणार होती. महेश मथाई सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमाचे नाव सेल्यूट ठेवण्यात येणार होते. गली बॉयच्या ट्रेलर लॉन्चवेळी फरहान अख्तर ने एका मोठ्या सिनेमाची घोषणा करणार होते. फरहान अख्तर त्याच्या डॉन 3 ची घोषणा करणार असल्याचे समजले होते. डॉन 3मुळे शाहरुखने अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी स्पष्ट होत आहे. अशात डॉन 3 साठी शाहरुखची वर्णी लागण्याची शंका आहे.
2018 हे वर्ष शाहरुख साठी काही उत्तम राहिले नाही. त्याचा झिरो सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात पात्र ठरला नाही. एकापाठोपाठ फ्लॉप सिनेमांमुळे त्याचे बॉलिवूडमध्ये टिकणे कठीण झाले. त्यामुळे त्याला एका मोठ्या सिनेमाची गरज होती. डॉन 1 आणि डॉन 2 सिनेमांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आता डॉन 3 च्या मध्यमातून शाहरुख पुन्हा एक हिट सिनेमा करण्याच्या तयारीत आहे.