मुंबई : 'कोई मिल गया'मध्ये जादूचा रोल कोणी केला होता. हे जाणून घेण्याची तुमच्यामध्ये देखील उत्सूकता असेल. कोण आहे तो अभिनेता ज्याने इतक्या सुंदर प्रकारे ही भूमिका केली होती. ज्यामुळे सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची खरी ओळख कधीच पुढे येत नाही हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया'मध्ये देखील अशीच एक भूमिका होती एलिअनची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांमध्ये जादू खूपच प्रसिद्ध झाला होता. आज देखील हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो. पण या सिनेमात जादूची भूमिका करणारा हा कलाकार कोण आहे. हे आज तुम्हाला सांगणार आहोत. ज्या व्यक्तीने ही भूमिका केली आहे त्या अभिनेत्याचं नाव इंद्रदेव पुरोहित आहे. हा सिनेमा एलिअन आणि पृथ्वीवरील कथेवर आधारीत आहे. एक एलिअन पृथ्वीवर येतो आणि तो येथेच राहून जातो. मग तो हृतिक रोशनला भेटतो जो त्याला चांगला बनवतो. हृतिक रोशनने सध्या सूपर 30 सिनेमामध्ये व्यस्त आहे.



इंद्रदेव यांनी खूपच सुंदर ही भूमिका साकराली होती.