भारतीची मिस यूनिवर्स हरनाझ कौर `या` व्यक्तीला करणार डेट
तिचं उत्तर वाचून तुम्हीही म्हणाल खरंच....
मुंबई : भारतातील 21 वर्षाच्या हरनाझ कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. याआधी 2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने आणि 1994 मध्ये सुष्मिता सेनने देखील हा मान पटकावला होता. 21 वर्षांनंतर मिस यूनिवर्स किताब भारताला मिळाल्यानंतर हरनाझचं सर्वत्र कौतुक झालं. नुकताचं झालेल्या एका मुलाखतीत हरनाझने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. शिवाय महत्त्वाच्या मुद्द्यांवर मत देखील मांडलं.
मुलाखतीत हरनाझला विचारण्यात आलं की, डेट करण्यासाठी हरनाझ कोणाला प्राधान्य देईल, श्रीमंत व्यक्ती की स्ट्रगलिंग तरूण? या प्रश्नाला उत्तर देताना हरनाझ म्हणाली की ती श्रीमंत माणसापेक्षा स्ट्रगलिंग करणाऱ्या मुलाला डेट करणे पसंत करेल. मला वाटतं की मला एका स्ट्रगल करणाऱ्या तरूणाला डेट करायला आवडेल.
याचं कारण देत हरनाझ म्हणाली, 'मी स्वतः संघर्ष केला आहे आणि भविष्यातही करणार आहे. मला वाटतं संघर्ष करणं आवश्यक आहे, तरचं आपण एकमेकांची किंमत करू शकू.' असं हरनाझ म्हणाली.
मिस युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर हरनाजचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिची लोकप्रियता किती वाढत आहे याचा अंदाज त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरून तुम्ही लावू शकता. मिस युनिव्हर्स बनताच हरनाजचे फॉलोअर्स सोशल मीडियावर वाढत आहेत.