Why Adnaan Shaikh Hides Wifes Face : 'बिग बॉस ओटीटी 3' स्पर्धक अदनान शेख जो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत होता. तर आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या बहिणीसोबतच्या वादामुळे तो चर्चेत आहे. अदनानच्या बहिणीनं त्याच्यावर मारहान करण्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय त्यानं हे देखील सांगितलं की अदनानची पत्नीचं आधी नाव रिद्धी होतं पण त्यानंतर तिनं धर्म बदलून आयशा नाव केलं. तर अदनानं लग्ना दरम्यान, मीडियासमोर त्याच्या पत्नीला आणलं पण त्यानं तरी सुद्धा तिचा चेहरा लपवून ठेवला. आता त्यानं त्या मागचं कारण सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना अदनाननं या मागचं कारण सांगितलं आहे. मला परद्यामध्ये ठेवायचं होतं. मला माझ्या पत्नीला कंटेट म्हणून वापरायचं नव्हतं, सोशल मीडियावर जसं दुसरे करतात. मला माझ्या लव्ह लाइफला प्रायव्हेट ठेवायचं आहे, कारण मी पाहिलं आहे की नजर ही लागते आणि नजर ही फार वाईट गोष्ट आहे. मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही, त्यावरून जी ट्रोलिंग होते. 



शादीच्या फंक्शनमध्ये जेव्हा अदनान, आयशाला मीडियासमोर घेऊन येणार होता. तेव्हा पापाराझीशी स्पेशल रिक्वेस्ट केली होती की त्याच्या पत्नीचा चेहरा रिव्हील करु नका. तर आयशा जेव्हा केव्हा पब्लिकमध्ये येते तेव्हा ती मास्क लावूनच येते. अदनानच्या लग्नानंतर त्याच्या बहिणीनं त्याच्यावर मारहान केल्याचा आरोप केला. त्यानं हे देखील सांगितलं की मला जितकं माहित आहे की रिद्धी त्याला कोणत्या क्लबमध्ये भेटली होती आणि तिचे विचार असे होते की तिला फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी अदनानसोबत राहायचं होत. खरंतर, तिला तिच्या एका मित्राकडून अदनानविषयी कळलं होतं आणि हे तिनं मला सांगितलं आहे. 


हेही वाचा : जगातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता शाहरुख किंवा टॉम क्रुझ नाही तर... फक्त एक हिट आणि 115000000000 संपत्तीचा मालक


दरम्यान, इफतनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत एक कुटुंबाचा फोटो आहे आणि या फोटोत लिहिण्याच आलं आहे की रश्मि जाधवची लेक आणि रितेश जाधवची बहीण. या फोटोमध्ये रिद्धि म्हणजेच आयशा देखील दिसत आहे. पण तिच्या घरच्यांना हे नातं मान्य नाही आणि त्यामुळे त्यांनी रिद्धीला घरातून बाहेर हकलवून लावलं आहे. तर गेल्या वर्षभरापासून रिद्धी ही अदनानसोबतच राहत होती.