बॉलीवूडच्या `सिंघम`चं अजय देवगण नाही तर हे आहे खरं नाव, जाणून घ्या का बदललं नाव?
अजय देवगणने आज बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत.
मुंबई : अजय देवगणने आज बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत. या दिवशी १९९१ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट 'फूल और कांटे' रिलीज झाला होता. इंडस्ट्रीतील सगळ्यात दिग्गज कलाकारांनी अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांसाठीही हा प्रसंग खूप खास होता. पण तुम्हाला माहित आहे का की, अजय देवगणचं खरं नाव ते नाही ज्याने आज जग त्याला ओळखतं.
खरं नाव का बदलावं लागलं?
आज संपूर्ण जग त्याला अजय देवगण या नावाने ओळखतं, पण बॉलिवूडच्या 'सिंघम'चं खरं नाव विशाल आहे. मग असं काय झालं की, बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अजय देवगणला त्याचं खरं नाव बदलावं लागलं? आज आम्ही तुम्हाला अजय देवगणबद्दलचा हा रंजक किस्सा सांगणार आहोत. 2009 मध्ये अजय देवगणने हे गुपित उघड केलं होतं.
जुने मित्र अजूनही VD म्हणतात
एका मुलाखतीमध्ये अजय देवगण म्हणाला, 'जेव्हा मला लॉन्च केलं जात होतं. तेव्हा आणखी 3 विशाल देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होते. माझ्या वडिलांकडे माझं नाव बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. जेणेकरून मी गर्दीत हरवून जावू नये. आजही माझे जुने मित्र मला व्हीडी (विशाल देवगण) म्हणतात.