काय होती ती एक शपथ, ज्यामुळं श्वेता बच्चन कधीच चित्रपटांमध्ये झळकली नाही
अमिताभ बच्चन यांची मुलगी, श्वेता बच्चन यांची लेक मात्र याला अपवाद ठरली.
मुंबई : पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्या मार्गानंच कारकिर्द घडवण्याचा निर्णय अनेकजण घेताना दिसतात. तरुणाईचा बराच कल हा कौटुंबीक व्यवसाय किंवा कुटुंबानं निवडलेल्या क्षेत्रांकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पण, अमिताभ बच्चन यांची मुलगी, श्वेता बच्चन यांची लेक मात्र याला अपवाद ठरली.
श्वेतानं शपथच घेतली होती की ती अभिनय क्षेत्रात कधीच करिअर करणार नाही. 48 वर्षीय श्वेतानं फार आधीच आपण या कलाजगतामध्ये कधीच काम करणार नसल्याचा निर्धार केला होता. (Amitabh bachchan shweta bachchan)
शालेय जीवनामध्ये श्वेता गायन आणि अभिनय स्पर्धांमध्ये सहभागी होत होती. खेळ किंवा हस्तकला याहून अभिनयाचे उपक्रम जास्त सोपे होते, असा तिचा विचार होता.
किंबहुना अभिनय क्षेत्रात करिअर का नको, असा प्रश्नही श्वेताला वारंवार विचारला गेला. या प्रश्नांची उत्तरं जोडली गेली आहेत एका शपथेशी...
काय म्हणाली होती श्वेता?
करिअरचं क्षेत्र म्हणून अभिनयाची निवड न करण्य़ामागचं कारण सांगताना श्वेता म्हणाली होती, 'मला शाळेत एकदा एका नाटकासाठी निवडलं होतं. कारण मी उंच होते. मला फक्त हवाईयन मुलगी बनवून तिथं उभं ठेवण्यात आलं होतं. अशी मुलगी, जिचं काही काम नसतं, ती फक्त व्यासपीठावर उभी असते. फक्त लहानशा हालचाली मला मिळाल्या होत्या. काहीही असो, पण या नाटकासाठी मी बरीच उत्सुक होते.'
काही गोष्टी आपल्या मतानं कधीच होत नाहीत, याचा प्रत्यय श्वेताला तेव्हाच आला होता. जेव्हा नाटकाचा दिवस उजाडला तेव्हा सादरीकरणाआधीच तिचा स्कर्ट फाटला.
श्वेता हेच सांगत शिक्षिकांकडे गेली, त्यावर इतर मुली स्टेजवर फिरतील पण, तू मात्र उभीच राहा; असं उत्तर त्यांनी दिलं.
तसंच झालं. सर्वजण व्यासपीठावर ठरल्याप्रमाणं नाटकातील भूमिका करत होते. श्वेता मात्र शांतपणे तिथे उभीच होती. जणूकाही ती सर्व विसरली. या प्रसंगानंतर आपण कधीच व्यासपीठावर परफॉर्म करणार नाही, अशी शपथ तिनं घेतली.
श्वेता यानंतर आईवडिलांसोबत चित्रपटांच्या सेटवरही जात होती. पण, एकदा तिनं विजेच्या सॉकेटमध्ये हात टाकला आणि तिला जबरदस्त धक्का बसला, यानंतर तिनं सेटवरही जाणं बंद केलं, अभिनयालाही तिनं दूर लोटलं.
अभिनय क्षेत्रात कारकिर्द करण्यासाठी कमालीची प्रतिभा असणं अतिशय महत्त्वाचं आहे हे श्वेता जाणते. ज्यामुळं आपल्याला कॅमेरा आणि गर्दीची भीती वाटत असल्याची बाबही ती नाकारत नाही.
लाईट्स, कॅमेरा आणि अॅक्शन हे शब्द एका कलाकारासाठी जितके महत्त्वाचे असतात तेच शब्द ऐकून श्वेता मात्र सुन्न होते.. तिच्या मनातील हीच भीती तिला रुपेरी पडद्यापासून दूर ठेवते.