Ranbir Kapoor -Anil Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात सगळ्यांचं लक्ष हे एका गोष्टीनं वेधलं आणि ते म्हणजे अभिनेता अनिल कपूर यांची अनुपस्थिती. चित्रपटात महत्त्वाची भूमिका असताना देखील अनिल कपूर हे ट्रेलर लॉन्चच्या वेळी उपस्थित नव्हते. याचं खरं कारण काय आहे याचा खुलासा रणबीर कपूरनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर आणि रणबीर यांची केमेस्ट्री उठून दिसली. हा चित्रपट या दोघांसाठी नक्कीच खास असणार आहे. ट्रेलरवरून रणबीरनं साकारलेली भूमिका खूप तीव्र दिसते. अनिल यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप उघड झाले नसले तरी चाहते आणि माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत आहेत. मीडिया आणि चाहत्यांनी या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले. काहींचा असा अंदाज आहे की अनिल कपूर कदाचित त्याच्या कामात व्यस्त असतील म्हणून ते उपस्थित राहू शकले नाही. त्याच्या अनुपस्थितीबद्दल रणबीरला विचारले असता तो म्हणाला, 'अनिल कपूर सध्या दुबईत आहेत. हा कार्यक्रम 21 तारखेला होणार होता परंतू काही कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला. तेथे त्याच्या आधीच वचनबद्धता होती. आम्हाला त्याची खूप आठवण येते. तो आमच्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. हा चित्रपट अनिल सरांशिवाय शक्यच झाला नसता. अनिल सर झकास, आम्हाला तुमची आठवण येत आहे.'


हेही वाचा : रणबीरनं आलिया नव्हे, जगातील 'या' सर्वात सुंदर मुलीच्या नावाचा टॅट्टू केला फ्लाँट


दरम्यान, रणबीरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे या चित्रपटात असणारी भली मोठी स्टार कास्ट. या चित्रपटात रणबीर आणि अनिल यांच्याशिवाय रश्मिका मंदाना, बॉबी देओल देखील आहेत. बॉबी देओलची या चित्रपटात खलनायकाची भूमिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्यात बॉबी देओलचा एकही डायलॉग नव्हता तरी देखील त्यांनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. सगळ्यांना बॉबीला मोठ्या स्क्रिनवर पाहण्याची उत्सुका आहे की नक्की त्याची भूमिका काय असणार आहे.