Bollywood Celebs Real Names : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif) ही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिनं गेल्या अनेक वर्षापासून हिट चित्रपटांमधून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन केले. सध्या कतरिना कैफला कोणत्याही परिचयाची गरज नाही. च्हात्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी विषयी सर्वकाही जाणून घ्यायचे असते. कतरिनाच्या स्टाईलला (Style) सगळेच फॉलो करत असतात. कतरिना कैफची फॅन फॉलोविंग (Fan Following) खूप चांगली आहे. पण आज तुम्हाला कतरिनाच्या बाबतीत त्या विषेष गोष्टी सांगणार आहोत जे अजून कोणालाही माहित नाही. कतरिना कैफ हे तिचं खरं नाव नसून तिचे खरे नाव काहीतरी वेगळंच आहे. चला तर मग जाणून घेऊया...



कतरिना कैफने नाव का बदलले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी आपली खरी नावं बदलून करिअरची सुरुवात केली होती. या यादीत कतरिना कैफचे देखील नाव आहे. याचा खुलासा खुद्द कतरिना कैफने केला आहे. कतरिना कैफ म्हणाली होती- तिचे खरे नाव कतरिना टर्कोट आहे. लोकांना तिचे नाव घेताना त्रास होऊ नये असे तिला वाटत होते. अशा परिस्थितीत त्यांनी नाव बदलणे योग्य मानले.



कतरिना कैफने वडिलांचे आडनाव ठेवले


भारतीय चाहत्यांना टर्कोट हे नाव उच्चारता येत नाही. अशा परिस्थितीत तिला टर्कोट आडनाव ठेवायचे नव्हते. कतरिनाच्या आईचे आडनाव देखील टर्कोट आहे. कतरिनाने जेव्हा तिचे आडनाव बदलले तेव्हा तिने वडिलांचे आडनाव ठेवले. त्याच्या वडिलांचे आडनाव कैफ आहे. त्याच वेळी, कॅटरिनाच्या पासपोर्टवर टर्कोट हे आडनाव अजूनही आहे.



बूम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण


कतरिना कैफने 2003 साली बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर तिने सलमान खानसोबत काम केले. त्यानंतर कतरिना कैफला खूप प्रसिद्धी मिळाली. कतरिना कैफही सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही कारणाने दोघांचे ब्रेकअप झाले. कतरिना कैफ आणि सलमान खानची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.



गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली


गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये, अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ यांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, दोघांनीही आपलं नातं गुपित कसं ठेवलं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आता कतरिना आणि विकी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल पैकी एक आहे.