दोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...
Why CID Got Off Air : `सीआयडी` हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला?
Why CID Got Off Air : भारताच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये जर कोणता शो बाजी मारत असेल तर तो आहे 'सीआईडी'. जवळपास 20 वर्ष हा शो सुरु राहिल्यानंतर अचानक एक दिवस बंद झाला. त्या मागचं कारण काय हा प्रश्न आजही प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांनी या शो मिळालेल्या यशानंतर हा कार्यक्रम ऑफ एअर का गेला याचा खुलासा केला आहे. शिवाजी साटम यांनी सांगितलं की शोच्या निर्मात्यांनी आणि सोनी चॅनल यांच्यात दुरावा येऊ लागला होता. त्यामुळे हा शो बंद करण्यात आला. तर हे सगळं होण्याचं देखील काय कारण होतं याचा खुलासा त्यांनी केला आहे.
शिवाजी साटम यांनी फ्रायडे टॉकीजला सांगितलं की याचं कारण CID आणि अमिताभ बच्चन सुत्रसंचालन करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपति' होणारी तुलना होती. शिवाजी साटम म्हणाले, 'आम्ही चॅनलला विचारायचो की ते असं का करत आहेत. आम्ही केबीसीसोबत टीआरपीमध्ये समोरा-समोर आले होतो. हो, शोची टीआरपी थोडी कमी झाली होती. पण कोणत्या शोची टीआरपी कमी होत नाही? शो बंद करण्याआधी त्यांनी त्यांच्या शेड्यूल बदललं.'
शिवाजी साटम पुढे म्हणाले, 'आधी हा शो रात्री 10 वाजता प्रसारित व्हायचा, पण त्यांनी ते बदलून 10.30 वाजता प्रदर्शित करू लागले तर कधीकधी 10.45 वाजता प्रदर्शित करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे प्रेक्षक हे टीव्हीपासून दूर झाले, लोकं शो कमी पाहू लागले.'
शिवाजी साटम यांनी निर्मात्यांसोबत चॅनलचे मतभेद याविषयी सांगितल आणि म्हणाले, 'त्यांना निर्मात्यांसोबत काही समस्या होती आणि त्यांना टाईम बदलायचा होता. पण आमच्यासाठी, हे फक्त प्रामाणिकपणाशी संबंधीत नव्हतं. हे मैत्रीविषयी होतं. आम्ही एकत्र बाहेर पडलो, आम्ही एक टीम होते.'
हेही वाचा : 100-200 नाही तर यंदाच्या Bigg Boss चं सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खाननं घेतले तब्बल 'इतके' कोटी!
'सीआईडी' चं प्रीमियर 1998 मध्ये झालं आणि 2018 मध्ये हा शो प्रदर्शित झाला. या शोमध्ये भारतात सगळ्यात जास्त काळ सुरु राहिलेल्या टेलिव्हिजन शोपैकी हा एक आहे. बी.पी. सिंग यांनी बनवलेला हा क्राइम शो लवकरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. शिवाजी साटम यांच्यासोबत या कार्यक्रमात सीनियर इंस्पेक्टर अभिजीतची भूमिका आदित्य श्रीवास्तवनं साकारली होती. तर सीनियर इंस्पेक्टर दयानंद शेट्टीची भूमिका ही दयानं साकारली होती. दिनेश फडनीसनं इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सची आणि नरेंद्र गुप्ता यांनी डॉ. साळुंखे यांची भूमिका साकारली होती.