Dilip Kumar and Saira Bano Never Had Kids : प्रेम म्हटलं की त्याला निभावनं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. असंचं काहीसं दिवंगत अभिनेता दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबत झालं. त्यांचं लग्न होणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला वयाचा फरक हा मुद्दा होता. लग्न झालं पण आई-वडील होण्याची इच्छा ही इतर जोडप्यांपर्यंत त्यांनाही असते. दरम्यान, एक अशी अटना झाली आणि त्यानंतर त्यांना कळलं की आता ते आई-वडील होऊ शकत नाही. त्यानंतर दिलीप कुमार यांच्या घरच्यांनी त्यांचं दुसरं लग्न केलं पण सायरा बानो आणि त्यांच्यात इतकं प्रेम होतं की ते कायम एकत्रच राहिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरा बानो दिलीप कुमार यांच्याशी जवळपास 22 वर्षं छोटी आहे. पण त्यांनी हट्ट धरला की ते लग्न हे दिलीप कुमारशी करणार आहेत. त्यांनी असं देखील सांगितलं की लग्नाच्या जवळपास दोन वर्षांनंतर त्या प्रेग्नंट राहिल्या पण त्यांच्या नशिबात मातृत्व अनुभवनं हे नव्हतं. नेमकं त्यावेळी काय झालं असा प्रश्न देखील अनेकांसमोर उपस्थित होता. त्याविषयी आज जाणून घेऊया की नेमकं काय झालं होतं. याचा खुलासा स्वत: सायरा बानो यांनी केला होता. 


सायरा बानो यांनी झी टीव्हीवर ‘जीना इसी का नाम है’ होता. त्या शोमध्ये सायरा बानो यांनी जेव्हा हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. तेव्हा सायरा बानोनं सांगितलं की ते बालपनापासून दिलीप कुमार यांच्या चाहत्या होत्या आणि म्हणायच्या की मी त्यांच्याशीच लग्न करणार. जेव्हा सायरा बानो भारतात आल्या तेव्हा त्यांनी अभिनेत्री होण्याचा निर्णय देखील दिलीप कुमार यांच्यासाठी घेतला होता. 


दिलीप कुमार या लग्नासाठी तयार नव्हते त्याचं कारण म्हणजे सायरा बोना यांच्या पेक्षा ते वयानं 22 वर्ष मोठे होते. दरम्यान, अनेकदा समजावून आणि बऱ्याच गोष्टी सांगूनही सायरा बानो या ऐकल्या नाही आणि ते सायरा बानो यांच्या हट्टापुढे नमले. दोघांनी 11 ऑक्टोबर 1966 साली लग्न केलं. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी एकत्र ‘दुनिया’, ‘बैराग’, ‘गोपी’, ‘सगीना महातो’ आणि ‘सगीना’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


दिलीप कुमार यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी ‘दिलीप कुमार: द सब्सटेन्स अॅन्ड द शॅडो’ मध्ये वडील न होण्याचं कारण सांगितलं. त्या पुस्तकात दिलीप कुमार यांनी लिहिलं की त्यांनी अखेर सायरा बोनो यांच्यासोबत पुन्हा एकदा पालकत्व अनुभवण्याचा विषय सोडून दिला. खरंतर, ही गोष्ट 1972 ची आहे जेव्हा सायरा बानो जवळपास 6-7 महिने प्रेग्नंट होत्या. एक दिवस चित्रपटाचं शूटिंग करून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात सायरा बानो यांचा गर्भपात झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्या आता कधी आई होऊ शकणार नाही. 


त्या घटनेनं दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचं संपूर्ण आयुष्य हे खाली-वर झालं. सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत सिमी यांनी सायरा बानो आणि दिलीप यांना प्रश्न विचारला की 'त्यांना कधी बाळाची कमी भासली नाही का? तर सायरा बानो यांनी दिलीप यांचे केस नीट करत सांगितलं की आम्ही एकमेकांची मुलं आहोत आणि अशीच एकमेकांची काळजी घेतो.' सायरा बानो आजही दिलीप कुमार यांची आठवण करत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करतात. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी आजही अनेक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.