का ठेवतात अमिताभ बच्चन अशी दाढी? समोर आलं खरं कारण
रुबाबदार पर्सनॅलिटी डोळ्यावर चष्मा आणि बोलण्याची विशीष्ट शैली पाहता आपल्या डोळ्यासमोर बीग बींचा चेहरा उभा राहतो. मात्र त्यांचा लूक खुलवणारी दाढी आता सध्या चर्चेत आहे. या आधी आपण त्यांची शैली फॉलो केल्याचं त्यांच्या चाहत्यांकडून पाहिलं आहे. अनेकांनी त्यांच्यासारखा लूक ठेवला आहे. मात्र पुन्हा एकदा अचानक त्यांची दाढी चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : बीग बी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. त्यांचे सगळेच सिनेमाही हिट झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच वर्गात त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रुबाबदार पर्सनॅलिटी डोळ्यावर चष्मा आणि बोलण्याची विशीष्ट शैली पाहता आपल्या डोळ्यासमोर बीग बींचा चेहरा उभा राहतो. मात्र त्यांचा लूक खुलवणारी दाढी आता सध्या चर्चेत आहे. या आधी आपण त्यांची शैली फॉलो केल्याचं त्यांच्या चाहत्यांकडून पाहिलं आहे. अनेकांनी त्यांच्यासारखा लूक ठेवला आहे. मात्र पुन्हा एकदा अचानक त्यांची दाढी चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये सहभागी झालेला स्पर्धक कपिलने बीग बी यांना त्यांच्या दाढीविषी विचारलं. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धक कपिलच्या मिशांचे कौतुक केले. बिग बींची स्तुती ऐकल्यानंतर कपिलने त्यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या दाढीची स्टाईल कशी मेंटेन ठेवता? या प्रश्नावर बिग बींनी मजेशीर उत्तर देत सांगितलं की, 'मी तिला मेंटेन नाही ठेवत, ती स्वतःची काळजी स्वत: घेते' असं बीग बी यांनी सांगितलं.
अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, 'अक्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला ही दाढी ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर जेव्हा मी आरशात पाहिलं तेव्हा मला ही स्टाईल खूप आवडली, तेव्हापासून मी ही स्टाईल जपली. त्याचवेळी ते पुढे म्हणाले की, तुमचं वय जसजसं वाढतं तसतसं तुमच्या चेहऱ्यावर डबल चिन दिसू लागतं, सुरकुत्या दिसू लागतात. माझ्या लक्षात आलं की ही दाढी डबल चीन लपवण्यास आणि सुरकुत्या मुक्त ठेवण्यास मदत करते.''
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांचा लूक चर्चेत आला आहे. त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना कायमच आवडतं. मग त्यांची स्टाईल असो किंवा मग त्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे असो. सगळ्यामुळेच बीग बी नेहमी चर्चेत असतात.
बीग बी अमिताभ बच्चन त्यांच्या कौन बनेगा करोडपती १५ व्या सीझनमधून टीव्हीवर परतले आहेत. या शोमध्ये जिथे बीग बी स्पर्धकाला कठीण प्रश्न विचारतात, तर दुसरीकडे ते त्यांच्या आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलतात. नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन यांनी आपल्या डबल चीन आणि सुरकुत्या मुक्त राहण्यामागील रहस्य देखील उघड केलं आहे.