मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुकर्जी 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात दोघांव्यतिरिक्त  सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) और शरवारी वाघ (Sharvari Wagh)  मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची संपूर्ण स्टरकास्ट द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. सध्या शोचा एक मजेदार व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कपिल चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत मस्ती करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एपिसोडमध्ये कपिल शोमध्ये सर्व स्टार्सचे स्वागत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रोमोमध्ये सैफ अली खानने सांगितले की, त्याला घरी रिकामे का बसायचे नाही. यावेळी कपिल सैफला विचारतो, 'सैफ सरांचा यंदाचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे. आधी 'तांडव', नंतर 'भूत पोलिस' आणि आता 'बंटी और बबली 2'. तुम्ही सतत काम करत आहात फॅमेली वाढवण्याचं टेन्शन तुम्हाला पण आहे...'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावर सैफ म्हणाला, 'फॅमेली वाढवण्याची चिंता नाही. जर घरी राहिलो तर आणखी मुलं होतील...' सैफचं असं उत्तर ऐकून सर्वांना हसायला आलं. सैफ अली खानला चार मुले आहेत. सैफची पहिली पत्नी  पहिली पत्नी अमृता सिंगला दोन मुलं आहे. त्यांची नावे सारा अली खान, इब्राहिम अली खान अशी आहेत. तर दुसरी पत्नी करीना कपूरने तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान यांना जन्म दिला आहे.