मुंबई : एखादा चित्रपट घडण्यासाठी त्याचा मागे मोठी फौज असते आणि म्हणूनच एखादा चित्रपट यशस्वी होतो. कलाकार, तंत्रज्ञ, गीतकार, मेकअप आर्टिस्ट आणि अनेक लोकांची मेहनत आणि त्यातून घडतो एखादा चित्रपट! सध्या सोशल मीडियावर नाच गं घुमा चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसतेय आणि अश्यातच कलाकारांच्या सोबतीने यात खारीचा वाटा आहे तो म्हणजे अभिनेता - निर्माता स्वप्नील जोशी याचा स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला पहिला चित्रपट "नाच गं घुमा" चर्चेत आहे. चित्रपटाचं प्रमोशन असो किंवा चित्रपटाच्या कोणत्याही कामात स्वप्नील कधीच मागे नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नील सध्या त्याच्या विविध चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त असून देखील " नाच गं घुमा " साठी तो आवर्जून प्रत्येक प्रमोशन मध्ये उपस्थित राहतोय. या सगळ्या बद्दल बोलताना स्वप्नील म्हणतो " निर्मिती करणं हे आव्हानाच काम होत पण नाच गं घुमा सारख्या चित्रपटाची निर्मिती माझ्याकडून होणं हे खूप कमालीच आहे. मला प्रत्येक गोष्ट करताना वेगेवगळे अनुभव मिळतात आणि संपूर्ण टीम सोबत एक सुंदर बॉण्ड झाला आहे. आता चित्रपटासाठी खूप उत्सुकता आहे. चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे प्रेक्षकांचं प्रेम कायम मिळतंय हे बघून अजून आनंद होतो आणि यातून अजून काम करण्याची प्रेरणा मिळतेय. माझ्या शूट मधून मला जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तसा मी फिल्म च्या प्रमोशन साठी जातोय "


आगामी काळात स्वप्नील " बाई गं " , " जिलबी " सारख्या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नाच गं घुमा प्रदर्शित होण्यासाठी अगदीच काही दिवस बाकी आहेत आणि सगळेच या साठी उत्सुक आहेत. 'नाच गं घुमा'चा ट्रेलर नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.  चित्रपटाचं पोस्टर,  शीर्षक गीत आणि गडबड गीत  तसंच टिझर यांच्या टप्प्याटप्प्याने केलेल्या  प्रकाशनाला प्रेक्षकांनी दिलेल्या तुफान प्रतिसादानंतर आलेल्या या ट्रेलरमुळे  रसिकांची या चित्रपाटाबद्दलची  उत्कंठा आणखी ताणली आहे.   


महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे 'नाच गं घुमा' कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी 'नाच गं घुमा'मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे,  सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि  बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या  चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.