तरुणींना का आवडतात वयानं मोठे पुरुष; दुसरं कारण वाचून तिथेच थांबाल
नात्याची वेगळी परिभाषा सर्वांनीच पाहिली.
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबतच्या नात्याची कबुली देत कोट्यधीश ललित मोदी यांनी अनेकांनाच धक्का दिला. प्रेमाला वाढत्या वयाच्या परिसीमा नसतात हेच या जोडीनं सिद्ध केलं. बरं प्रेमाच्याच बाबतीत वयानं मोठा साथीदार पसंत करण्याचं हे पहिलंच उदाहरण नाही. (why girls like man older than them take example of actress sushmita sen and lalit modi)
कलाजगतात अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये एखाद्या तरुण अभिनेत्रीनं तिच्याहून वयानं मोठ्या जोडीदाराला निवडलं. किंबहुना अशा कैक तरुणी आहेत ज्यांना तरुणांपेक्षा पुरुषांबाबत जास्त आकर्षण वाटतं.
वयानं मोठ्या पुरुषांविषयी तरुणींना नेमकं आकर्षण का वाटतं यामागेही काही खास कारणं आहेत. अशी कारणं, ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल.
Mature पुरुषांना तरुणींची पसंती
जसजसं वय वाढतं, तसतसं मुलं/ पुरुष अधिक समजुतदार होतात. तरुणींना असे समजुतदार, मॅच्योर पुरुष पाहताक्षणी भावतात. अशा जोडीदारासोबत त्या स्वत:ला सुरक्षित समजतात.
अनुभवी पुरुषांना तरुणींचं प्राधान्य
वाढत्या वयासोबतच पुरुषांना विविध क्षेत्रांत अनुभव प्राप्त होतो. परिणामी मुली अशा अनुभवी पुरुषांवर भाळतात. विविध परिस्थितींना तोंड देणारे पुरुष त्यांना आवडू लागतात. या एका कारणामुळेही तरुणी वयानं मोठ्या पुरुषांची जोडीदार म्हणून निवड करतात.
पुरुषांचा आत्मविश्वास वेगळीच छाप पाडतो
वयानं मोठ्या असणाऱ्या मुलांमध्ये / पुरुषांमध्ये अनुभवामुळं आत्मविश्वासही खचून भरलेला असतो. ही एक बाब तरुणींना त्यांच्याकडे आकर्षित करते. असे पुरुष महिलांची मानसिकता समजून घेण्यात कोणतीही चूक करत नाहीत, ज्यामुळं त्यांना पहिली पसंती मिळते.
आत्मनिर्भरता कोणाला आवडत नाही?
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे पुरुष जीवनात स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहिलेले असतात. त्यांच्यातील हीच आत्मनिर्भरता आणि निर्णयक्षमता तरुणींच्या मनात घर करते.
स्वत:चं आयुष्य जगण्यासोबतच जोडीदारानं आपल्या सहचारिनीला किंवा पार्टनरलाही तितक्याच मनमुरादपणे जगू द्यावं ही अपेक्षा वयानं मोठ्या साथीदाराकडून पूर्ण होते, म्हणूनच की काय याच धर्तीवर हल्ली तरुणी आपला सोबती निवडतात.