मुंबई : अंतराष्ट्रीय महिला (International womens day) दिना निमित्त टीव्हीवर सध्या सुरु असलेल्या रिआलिटी सिंगिंग शो 'इंडियन आयडल'मध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ड्रीम गर्ल हेमा मालिनीला प्रमुख पाहुणे म्हणूण आमंत्रीत करण्यात आले. शोमधल्या सगळ्या स्पर्धकांनी हेमा मालिनीची जुणी गाणी गायली. त्यामुळे तिच्या जुण्या आठवणी ताज्या झाल्या. शोच्या मेकर्सनीही ड्रीम गर्ल हेमा मालिनीचे काही क्षण तिला आठवणीत आणून दिले. जेव्हा शोमध्ये हेमा मालिनीच्या मुलीचा म्हणजेच अभिनेत्री ईशा देओलचा व्हिडिओ चालवला तेव्हा ईशाने आपल्या आई बद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या, त्यावेळेस हेमा मालिनी इतकी भावूक झाली की तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाली ईशा?


इंडियन आयडल शोमध्ये चालवलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या आई बद्दल सांगताना ईशा म्हणाली, "तुमच्यासाठी हेमा मालिनी ही ड्रीम गर्ल असली तरी ती माझी अम्मा आहे.  तिने माझ्या करियरसाठी खूप मदत केली. पुढे ती म्हणाली मला स्वत:वर गर्व आहे की मी तुझी मुलगी आहे. मी स्वत:ला नशीबवान समजते की देवाने मला तुझी मुलगी म्हणून पाठवलं. ईशाच्या या सर्व गोष्टी ऐकूण  हेमा मालिनीच्या डोळ्यातून आश्रू थांबले नाहीत.


पुढे हेमा म्हणाली ईशा खूपच गुणी मुलगी आहे, फक्त ईशाच नाही तर अहाना सुद्धा तितकीच गुणी आहे. मी धर्मेंद्रजीची आभारी आहे, ज्यांनी मला इतक्या सुंदरआणि  प्रेम करणाऱ्या मुली दिल्या. त्यानंतर ती इतकी भावुक झाली की तिला पुढे शब्दच फुटले नाहीत.


हेमा मालिनीच्या काही आठवणी
शो दरम्यान अंजली गायकवाडने 'ये दिल हे नादान...और झूठे नैना बोले...' हे गाणं गायलं तेव्हा तिच्या या गाण्याची सर्वांनी खूप स्तुती केली, तिच्या या पर्फोमन्सवर सगळ्या परीक्षकांनीही  कौतुकाची थाप दिली.  हेमा मालिनीनेही तिला शाबाशकी दिली आणि तिच्या काही आठवणी शेअर केल्या.


तिने सांगीतले "1976 मध्ये 'चरस' या सिनेमात धर्मेंद्र आणि मी एकत्र काम केले. या सिनेमाची शूटींग भारता बाहेर झाली. या सिनेमाच्या शूटींग दरम्यान मी आणि धर्मेंद्रजी एकमेकांना डेट करत होतो. दरवेळी शूटींगच्या वेळेस माझी आई आणि माझी काकी बरोबर यायची पण या वेळेस शूटींगसाठी माझ्यासोबत माझे वडिल आले. कारण त्यांना माझ्या आणि धर्मेंद्रजी यांच्यातल्या मैत्रीची कल्पना होती. माझ्या वडिलांना ही मैत्री मुळीच आवडत नव्हती, त्यामुळे ते शूटींग दरम्यान माझ्या अवतीभोवतीच आसायचे. मी गाडीत बसले की लगेचचं माझे वडिल माझ्या बाजुच्या सीटवर येऊन बसायचे, पण धर्मेंद्रजी सुद्धा हुशार आहेत ते लगेच गाडीच्या दुसऱ्या बाजुने येऊन माझ्या बाजुला बसायचे आणि म्हणायचे मलाही तुमच्या सोबत यायचे आहे.