मुंबई : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. निधन झालं तेव्हा त्या गोव्यात होत्या. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. सोनाली फोगट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. सोनाली यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो अभिनेता अली गोनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली यांच्या निधनानंतर खास व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने त्यांची माफी मागितली आहे. 'कळतच नाही कसं बोलू... दोन दिवसांपूर्वी  तुम्ही मला मेसेज केला आणि मला आशीर्वाद दिले. मझ्या नव्या व्हिडीओला प्रेम दिलं...'


'तुम्ही मला विचारलं माझ्यासोबत पण असा एक व्हिडीओ कर.. मी तुम्हाला वचन देखील दिलं, पण ते वचन राहून गेलं... मला माफ करा.. तुमची कायम आठवण येईल...' अली गोनीने सोनाली यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोनाली  फोगट बॉलिवूड , राजकारण आणि सोशल मीडियावर सक्रिय होत्या. फोगट फक्त त्यांच्या प्रोफेशन जीवनामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत राहिल्या. जेव्हा 43 वर्षीय सोनाली फोगट यांचं नाव 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत जोडलं गेलं तेव्हा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 


ही गोष्ट आहे बिग बॉसच्या घरातील आहे. जेव्हा सोनाली यांनी अभिनेता अली गोनीबद्दल असलेल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या. सध्या दोघांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.