मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या माध्यमातूम अभिनय क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारी आलिया कायम चर्चेचा विषय असते. आता देखील ती एका विशेष कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे दिवाळीत तिने घातलेल्या लेहंग्या विषयी. तिचा हा लेहंगा अत्यंत खास आहे. कारण दिवाळी आणि बाल दिनाचं महत्त्व लक्षात घेत हा लेहंगा डिझाइन करण्यात आला आहे. हा लेहंगा साकारण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिची स्टाटलिस्ट एमी पटेलने दिवाळी आणि बालदिन मोठ्या आनंदात आणि थोड्या अनोख्या पद्धतीत साजरा केला आहे. आलिया दिवाळीमध्ये माधुर्य क्रिएशनद्वारा डिझाईन केलेला लेहंगा घातला. ज्याचं डिझाईन खोल विचार करून करण्यात आलं आहे. 



तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की हा लेहंगा वेस्ट ऑर्गेनिक फॅबरिकपासून बनला आहे. ज्याला एकाच हेतूने जवळपास ३५ मुलांनी डिझाइन केलं आहे. या लेहंग्याला डिझाइन करण्यासाठी तब्बल ४ महिन्यांचा कालावधी लागला. 


स्थानिक कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांचा सन्मान करण्यासाठी ही एक अद्भुत योजना असल्याचं एमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. या लेहंग्यामध्ये आलिया अत्यंत सुंदर दिसत आहे. 


आलियाने देखील लेहंग्यामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'यंदाच्या दिवाळीत काही वेगळं करण्याची इच्छा होती. हा लेहंगा बऱ्याच लोकांच्या मेहनतीचं फळ आहे. AOL free school च्या विद्यार्थ्यांनी आणि कारागिरांनी अनेक महिने मेहनत घेतल्यानंतर हा लेहंगा सत्यात उतरला आहे..' असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.