`बोलणाऱ्याची माती पण विकली जाते...` असं का म्हणतोय `आई कुठे काय करते` फेम मिलींद गवळी?
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारुन घराघरात पोहचलेला अभिनेता नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.
मुंबई : अभिनेता मिलींद गवळी कायमच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आपलं मत स्पष्टपणे मांडण्यासाठी मिलींद ओळखला जातो. आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारुन घराघरात पोहचलेला अभिनेता नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकतंच मिलींदने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केलीये जी पाहून त्याचे चाहेतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. आणि कदाचित ते खरंही आहे कारण रडक्या हट्टी मुलांना जास्त chocolates मिळतात. बरेच वेळेला समोरचा माणूस समजून घेयील असं वाटतं ,पण समोरच्या माणसाला काही कळतच नाही, जेव्हा आपण त्या समोरच्या माणसालासांगतो की तू माझा विचारच केला नाहीस, मग तो म्हणतो अरे मला बोलायचं ना, मला काय माहित, मला काय स्वप्न पडलं होतं का,माझ्या बाबतीत एक गोष्ट नेहमी घडायची, माझ्या आईची खूप आग्रह करून जेवायला वाड्याची सवय होती , दोन पोळ्या खाणाऱ्या माणसाला ती पाच सहा पोळ्या नक्कीच खाऊ घालायची, समोरचा माणूस कितीही नाही म्हटला तरी ती वाढायची, आता मला ती सवय होती, आता माझ्या आईचं बघून बाकीच्यांना पण ही सवय लागली होती त्यामुळे ते सुद्धा आग्रह करायला लागले होते, त्यामुळे मला एक सवय होती की आपण स्वतःहून कधी मागायचं नाही.
पुढे अभिनेत्याने लिहीलंय, आपल्याला आग्रह केला तरच मग आपण खायचं,पण काही घरांमध्ये प्रत्येक जण आपापलं वाढून घ्यायचा, कोणी कोणाला आग्रह करायचं नाही, ज्या ला जेवढं वाटेल तेवढं त्यांनी स्वतःहून खायचा, बर अशा ठिकाणी मी काय उपाशीच रायचो , कारण मला मागून खायची सवयच नव्हती,सुरुवातीला कॅम्पस सिरीयलच्या वेळेला, ही सगळी पोरं, जेवणावर अक्षरशः तुटून पडायची, पण मग स्वतःहून वाढून घ्यायचं नाही म्हणून मी दिवस दिवस उपाशी रायते, रात्री उशिरा घरी जाऊन आई जेवायला वाढेल तेव्हा जेवायचो,आता तर घरचा जेवणचा डबा रोड सेटवर येतो, आणिहल्ली मी कुठेही बाहेर जेवायचं टाळतोच, कितीही मोठं लग्न असेल , कितीही मोठ्या हॉटेलमध्ये असलं तरी मी काही जेवायला तिथे थांबत नाही, आणि buffet हा प्रकारच मुळात मला आवडत नाही,
पुढे अभिनेत्याने लिहीलंय, पूर्वी मात्र लग्नाच्या पंगती असायच्या, आणि त्या पंक्तींमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळायची, काही माझ्यासारखी लाजाळू माणसं वाढलं तर खायचं, नाही वाढलं तर आपलं आहे तेवढं खायचं आणि उठून जायचं, पण काही जण तर, वाढणाऱ्याला मोठमोठ्याने हाका मारून बोलून घेयचे, अरे मठ्ठा आण, अरे जारा बुंदी घेऊन ये, पापड आण, पूर्या घेऊन ये रे.खरंच काही माणसं अजिबात लाजत नाहीत.हे तर जेवणाचं झालं इतर गोष्टींच्या बाबतीत सुद्धा हे च लागू आहे ,अगदी सगळेच नाही किंवा उद्धट पणे नाही पण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या बोलून दाखवल्या पाहिजे, आवश्यक असलेली वस्तू मागितली पाहिजे, आपल्या हक्काच्या गोष्टी आपण सांगितलं पाहिजेत ,नाहीतर लोक त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रमलेली असतात, तुमच्या मनातल्या गोष्टी ते समजून घेतीलच असं नाहीये.पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं.'' अशी पोस्ट मिलींदने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलीये. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.