मुंबई : अभिनेता आर माधवन सध्या तुफान चर्चेत आला आहे. आता रंगत असलेल्या चर्चांमागे कारण देखील खास आहे. माधवनने त्याच्या मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माधवनने मुलाच्या 16व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत फोटो शेअर केला आहे. सध्या  माधवनच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर त्याची तुलना गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत होत आहे.  आर माधवनचा मुलगा हुबेहूब निरज चोप्रासारखा दिसत आहे... असं युझर्स म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर माधवनने मुलाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'जवळपास सर्वचं गोष्टीमध्ये माझा पाठलाग करण्यासाठी धन्यवाद. ज्यामध्ये मी माहीर, त्यामध्ये मत्सर वाटण्यासाठी सुद्धा, पण माझी छाती अभिमानाने रुंदावते. तुझ्याकडून मी खूप काही शिकलो आहे. आता तुझा नवा प्रवास सुरू झाला आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...'



माधवनच्या मुलाचं नाव वेदांत आहे. माधवनच्या चाहत्यांनी देखील वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत. माधवनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 'रंग दे बसंती', 'रहना है तेरे दिल में', 'थ्री इडियट्स' आणि 'तनु वेड्स मनु' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसला. सध्या त्याच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' चित्रपटाबद्दल चर्चा रंगत आहे. 


'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' चित्रपटाची कथा रॉकेट शास्त्रज्ञ नम्बी नारायणन यांच्यावर आधारित आहे. नम्बी नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ होते, ज्यांना देशाशी विश्वासघात केल्याच्या खोट्या आरोपात अडकवले गेले आणि 1994 साली अटक करण्यात आली.  त्यानंतर अखेर 1998 साली त्यांची निर्दोष मुक्ताता झाली.