जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात एक प्रेम आणि राग असं दुहेरी नातं आहे. कायमच त्या कॅमेऱ्यासमोर रागावताना किंवा चिडचिड करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत, जया बच्चन आणि  पापाराझी यांच्यात खटके उडताना पाहिले आहे. पापाराझी मानव मंगलानी यांनी अलीकडेच ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन असे का वागतात याबद्दल बोलले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच अलिना डिसेक्ट्सला दिलेल्या मुलाखतीत मानव मंगलानीने सांगितलं की, 'जया बच्चन मीडिया ॲडिक्ट नाही. त्यांच्या काळात मीडिया किंवा अशा गोष्टी फार कमी होत्या. आता, प्रसारमाध्यमे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत… पत्रकार परिषद किंवा चित्रपटाच्या प्रीमियरला त्यांची हरकत नाही. जेव्हा पापाराझी त्यांचा पाठलाग करतात तेव्हा त्या त्ंयाचा तिरस्कार करतात. आपल्या खासगी ठिकाणी एवढे लोक पाहून त्यांना धक्काच बसतो, 'इथे इतके लोक कसे जमले.'


जया बच्चन का चिडतात?


मानव मंगलानी पुढे सांगतो की, 'मग त्याचे स्वतःचे मजेदार विनोदी किस्से आहेत. पापाराझी फोटो काढताना जो अँगल घेतात त्यावरही जया बच्चन यांना आक्षेप असतो. त्या आतापर्यंत सगळ्या मीडियासोबत कम्फर्टेबल नाहीत. त्या फक्त ठराविक लोकांशी नीट वागतात. मानव पुढे म्हणतो की,  'जया बच्चन यांचा स्वतःचा फंडा आहे.'


जया बच्चन या गोष्टीचा तिरस्कार करतात


'व्हॉट द हेल नव्या' पॉडकास्टच्या भागामध्ये जया बच्चन यांनी स्पष्ट सांगितलं की, त्या पापाराझीचा तिरस्कार का करतात? हे लोक तुमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करतात या गोष्टी जया बच्चन यांना आवडत नाही. जया बच्चन म्हणतात की, 'मला त्याचा तिरस्कार आहे. मला त्या लोकांचा तिरस्कार आहे जे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि सगळ्याच खासगी गोष्टी जगासमोर येतात.


जया बच्चन यांना काय वाटते?


जया बच्चन म्हणाल्या, 'मला अगदी सुरुवातीपासूनच हे जाणवते. तुम्ही माझ्या कामाबद्दल बोला काहीच हरकत नाही. म्हणजे अगदी खराब काम केलं तर तसं सांगा. मला वाईट वाटणार नाही. पण हे सगळं चांगल नाही. मीडियासमोर मला चांगल वागायचं नाही. बाकी माझा काही आक्षेप नाही. कामाबद्दल बोलायचं झालं तर,  जया बच्चन यांनी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये काम केलं आहे. या चित्रपटात त्यांनी रणवीर सिंहच्या आजीची भूमिका साकारली होती.