मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर गेलंय. अज्याचं फौजी होण्यापर्यंतचा प्रवास आणि शितलीसोबतच लग्न प्रेक्षकांनी भरपूर पसंद केलं. या मालिकेतील दोन खलनायिका म्हणजे जयश्री आणि मामी. या दोघींनी अल्पावधीत या मालिकेला आपल्या नकारात्मक भूमिकेने ओळख मिळवून दिली. पण आता या मालिकेत अज्या - शितलीच्या लग्नानंतर एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट आहे  जयडी आणि मामी या दोघींनी मालिकेतून घेतलेली एक्झिट. मालिका अगदी टर्निंग पॉईंटला असताना जयडी म्हणजे किरण धाने आणि मामी विद्या साळवे यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. 


प्रेक्षकांना पाहायला मिळालं हे टि्वस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अज्या - शितलीचं लग्न झाल्यानंतर मामीने खास्ट सासू साकारली आणि जयडीने देखील आपलं प्रेम मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवला. मालिका अशी रंगत असताना अचानक मामी, फेडरेशन अध्यक्षा पुष्पा भोईते आणि जयडीने मालिकेचा निरोप घेतला आहे. तडकाफडकी झालेल्या या बदलामुळे चाहते गोंधळात पडले आहे. गुरूवार म्हणजे 21 जून रोजीच्या भागात शितली जयडी संसार पुन्हा जुळून यावा यासाठी प्रयत्न करते. पण हर्षवर्धन तिचा हा प्रयत्न हाणून पाडतो. यामुळे मामी शितलीला नको ते बोलते. घरात वाद निर्माण होतो. आणि तेव्हाच मामा मामीवर भडकून दिला घरातून निघून जाण्यास सांगते. यावेळी मामी जयडीला घेऊन घर सोडते.आणि ती मंदिरात जाते. याचवेळी या मालिकेतील ट्विस्टबरोबर प्रेक्षकांना आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला. तो म्हणजे मालिकेतील जयडी आणि मामी ही दोन्ही पात्र बदलली होती. 


जयडी आणि मामीने का सोडली मालिका? 


मिळालेल्या माहितीनुसार, जयडी म्हणजे किरण धाने आणि मामी विदया साळवे यांनी या मालिकेतून निरोप घेतला आहे. आपली खाजगी कारण देत या दोघींनी मालिकेचा निरोप घेतला आहे. त्याचप्रमाणे मालिकेतील मानधन वाढवून मिळावं यासाठी मागणी केली होती. पण अचानक मानधन वाढवून देणं शक्य नसल्याचं वरिष्ठांनी सांगितलं होतं. अनेकदा मानधनाशी जुळवून घ्या असं सांगूनही या दोघींनी मालिका पुढे न करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच मालिकेत आता किरण धाने आणि विद्या साळवे यांच्या जागी दोन नव्या कलाकारांना घेण्यात आलं. 


कोण साकारतात यांची भूमिका? 


जयडी आणि मामी हे लागिरं झालं जी या मालिकेतील महत्त्वाच्या दोन महिला खलनायिका आहेत. या दोघींनी कारस्थान करून अज्या - शितलीला त्रास देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघींच्या नकारात्मक भूमिकेमुळे ही मालिका प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवत आहेत. आता जयडीची भूमिका पूर्वा शिंदे करत असून मामीच्या भूमिकेत कल्याणी चौधरी दिसणार आहेत.