मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींचे घटस्फोट झाले आहे.  असचं एक कपल म्हमजे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं नातंही असंच होतं. दोघांचे लग्न 1991 मध्ये झालं. दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं पण त्यांनी स्वतःच्या इच्छेने लग्न केलं. यानंतर सारा अली खान आणि इब्राहिम या दोन मुलांचे अमृता आणि सैफ पालक बनले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र लवकरच सैफ आणि अमृताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघांचा घटस्फोट का झाला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अमृताचं त्याच्यासोबत आणि त्याच्या कुटुंबाशी असलेलं वागणं बदललं होतं. ती त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा आणि सबा यांचा खूप इंसल्ट करायची.



इतकंच नाही तर सैफच्या म्हणण्यानुसार, अमृता त्याला सतत टोमणे मारायची आणि इंसल्टदेखील करायची. तो एक वाईट नवरा आणि वाईट बाप असल्याची ती त्याला प्रत्येक क्षणी जाणीव करून देत असे. या गोष्टींना कंटाळून त्याने अमृतापासून घटस्फोट घेतला. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनी सैफने करीना कपूरसोबत दुसरं लग्न केलं. दोघंही लग्नाच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आता सैफ-करीनाला तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुलं आहेत.